ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
कार्यकारी अभियंता श्री. सर्वगौड यांना माऊली मित्रमंडळ व संलग्न मित्रमंडळांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ; शहरातील विकास कामाबद्दलही चर्चा.

कार्यकारी अभियंता श्री. सर्वगौड यांना माऊली मित्रमंडळ व संलग्न मित्रमंडळांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ; शहरातील विकास कामाबद्दलही चर्चा.

प्रकाशन: 01 Apr 2024 09:16 PM
वाचन संख्या 105

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवलीतील माऊली मित्र मंडळ व संलग्न मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर , माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते संजय बाबी मालंडकर यांनी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. अजय कुमार सर्वगौड यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे वाढदिवस अभिष्टचिंतन केले. यावेळी माऊली मित्र मंडळाचे उपाध्यक्ष अविनाश गावडे, सुभाष उबाळे, भगवान कासले, व्यापारी मित्र मंडळाचे प्रभाकर कदम, निलेश निखार्गे, बाबुराव घाडीगावकर, प्रसाद पाताडे, प्रसाद उगवेकर, योगेश पवार, बाजारपेठ मित्र मंडळाचे ( अप्पासाहेब पटवर्धन चौक) बाळा शेठ बाणे उपस्थित होते,

यावेळी संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर व सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर यांनी अजय कुमार सर्वगौड यांना शुभेच्छा दिल्या. सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्या उपस्थितीत गणपती साना येथे पुलाचे काम सुरू केले त्याबद्दल आभार व्यक्त केले. हे काम सुरू करताना , पाणी अडविण्यासाठी घातलेला मातीचा बंधारा हटविल्याने , आजच्या घडीला गणपती साना येथील नदीपात्रात पाणी नसल्याने, पुन्हा नव्याने मातीचा बंधारा घालून तेथे पाणी साठविण्या संदर्भात राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी चर्चा केली.

माजी नगरसेवक , सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर यांनी यावेळी असे म्हटले की आम्ही कांबळे गल्ली, बाबा भालचंद्र महाराज नगर येथील रहिवासी असल्याने आम्हाला गणपती साना येथील संपूर्ण परिस्थिती माहिती आहे. आजच्या घडीला परिसरातील सर्व विहिरींची पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे, तरी आपण लवकरात लवकर यासंदर्भात उपाययोजना करावी. यावेळी कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगौड यांनी पाहणी करून, उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्याचे समजते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स