ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
मालवणात पर्यटन व्यावसायिकांसाठीची कार्यशाळा संपन्न.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मालवणात पर्यटन व्यावसायिकांसाठीची कार्यशाळा संपन्न.

प्रकाशन: 29 Mar 2024 06:44 PM
वाचन संख्या 111

केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन योजनेबाबत प्रकल्प समन्वयक मंदार हाडके यांनी दिली प्रकल्पाविषयी माहिती..

मालवण | प्रतिनिधी : केंद्र सरकारची ‘स्वदेश 2.0’ योजना कार्यान्वित करण्यात आली असून जिल्ह्यातील शाश्वत पर्यटनासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या च्या माध्यमातून नियोजन बद्ध सुरवात झाली आहे. या नुसार जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रातील हॉटेल, होम स्टे, ऍग्रो टुरिझम, रीसॉर्ट क्षेत्रातील पर्यटन व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी निधी पोर्टल रजिस्टर माहितीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे पर्यटन व्यावसायिकांची कार्यशाळा २८ मार्चला संपन्न झाली. या मध्ये प्रकल्प समन्वय मंदार हाडके यांचा पर्यटन व्यावसायिक महासंघाचे मालवण शहर अध्यक्ष श्री मंगेश जावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना मंदार हाडके म्हणाले की सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असून केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात सिंधुदुर्ग हा एकमेव जिल्हा केंद्रीय स्वदेश दर्शन पर्यटन योजनेत समाविष्ट करण्यात आला असून या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाश्वत पर्यटन विकासासाठी कार्य होणार असून स्थानिक पर्यटन व्यावसायिकांच्या समन्वय साधून कार्य केले जाणार आहे. तसेच यावेळी निधी पोर्टल वर पर्यटन व्यावसायिकांनी कश्या पद्धतीने नोंदणी करावी यांचे मार्गदर्शन केले, न्याहारी निवास सर्वेक्षण तसेच कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण कार्यक्रम जिल्ह्यातील तालूका स्तरावरील गावा गावात राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी श्री विष्णू मोंडकर (स्वदेश दर्शन समिती सदस्य आणि अध्यक्ष पर्यटन व्यवसायिक महासंघ) यांनी सांगितले की जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय स्थानिकांनी कुठल्याही शासकीय मदतीशिवाय स्वकर्तृत्वावर उभा केला असून ह्या भागात आज जिल्ह्यात पर्यटन व्यवसाय बहरतं आहे जिल्ह्यातील शाश्वत पर्यटन विकासासाठी स्वदेश दर्शन योजनेच्या माध्यमातून सागरी पर्यटना बरोबर कृषी, मेडिकल , हिस्ट्री जंगल टुरिझम क्षेत्रात काम काम होणार असून स्थानिक पर्यटन व्यावसायिक आणि प्रशासन या मध्ये समन्वय साधणे पर्यटन स्थळांवर आवश्यक सुविधा निर्माण करणे साठी प्रयत्न केला जाणार आहे यावेळी स्थानिक जिल्ह्यातील व्यावसायिकांनी या मध्ये सहभाग घेतला. यावेळी पर्यटन व्यावसायिक महासंघ सल्लागार श्री गुरु राणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी जागा उपलध करून दिल्या बद्दल मालवण नगरपालिकेचे आभार मानण्यात आले.

यावेळी मिलिंद झाड, श्री किशोर दाभोलकर, प्रफुल मांजरेकर, सुनील देसाई, दादा वेंगुर्लेकर आदी पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स