ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या निधी पोर्टल माहितीसाठी पर्यटन व्यावसायिकांची मालवणात कार्यशाळा : श्री विष्णू मोंडकर. (अध्यक्ष, पर्यटन व्यावसायिक महासंघ.)

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या निधी पोर्टल माहितीसाठी पर्यटन व्यावसायिकांची मालवणात कार्यशाळा : श्री विष्णू मोंडकर. (अध्यक्ष, पर्यटन व्यावसायिक महासंघ.)

प्रकाशन: 26 Mar 2024 05:15 PM
वाचन संख्या 153

मालवण | प्रतिनिधी : केंद्र सरकारने भारतातील पर्यटन क्षेत्रात वाढ होण्यासाठी देशातील ५८ जिल्ह्यांची निवड केली आहे. महाराष्ट्र राज्यातील एकमेव सिंधुदुर्ग जिल्ह्याची यात निवड करण्यात आली असून ही योजना स्वदेश ‘२.०’ या नावाने कार्यान्वित करण्यात आली असून जिल्ह्यातील शाश्वत पर्यटनासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या च्या माध्यमातून नियोजन बद्ध सुरवात झाली आहे. या नुसार जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रातील हॉटेल, होम स्टे, ऍग्रो टुरिझम, रीसॉर्ट, रिक्षा व्यावसायिक ,टुरिस्ट व्हेईकल व्यावसायिक क्षेत्रातील पर्यटन व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी निधी पोर्टल रजिस्टर माहितीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे मामा वरेरकर नाट्यगृह येथे पर्यटन व्यावसायिकांची २८ मार्चला दुपारी सकाळी ११ वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीचा मध्ये युनिट्सचे निवास सर्वेक्षण निधी पोर्टल नोंदणीसाठी तसेच कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण कार्यक्रम मार्गदर्शन करण्यात येणार असून यासाठी श्री मंदार हाडके सिंधुदुर्ग येथील प्रकल्प समन्वयक,पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गत स्वदेश दर्शन 2.0 हे उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार असुन या माध्यमातून जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायिकांना व्यवसाय वाढीसाठी मदत होणार असून पर्यटन व्यावसायिकांनी या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन श्री विष्णू मोंडकर स्वदेश दर्शन समिती सदस्य तसेच अध्यक्ष पर्यटन व्यवसायिक महासंघ यांनी केले आहे .

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स