ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सिंधुदुर्गचा सुपुत्र हरियाणात उच्च अधिकारीपदी ; महाळुंगे गांवचे ओंकार राणे यांची हरियाणा राज्यात उद्यान विकास अधिकारीपदी निवड.

सिंधुदुर्गचा सुपुत्र हरियाणात उच्च अधिकारीपदी ; महाळुंगे गांवचे ओंकार राणे यांची हरियाणा राज्यात उद्यान विकास अधिकारीपदी निवड.

प्रकाशन: 26 Mar 2024 06:03 PM
वाचन संख्या 166

शिरगांव | संतोष साळसकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड तालुक्यातील महाळुंगे गांवचे श्री. ओंकार हरिकृष्ण राणे यांनी हरियाणा लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत उत्तीर्ण होऊन, त्यांची वयाच्या २७ व्या वर्षी हरियाणा राज्यात उद्यान विकास अधिकारी पदी निवड झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्यातून त्यांची ही एकमेव निवड आहे.

श्री. ओंकार राणे हे शेतकरी कुटुंबातील असून त्याचे प्राथमिक शिक्षण जि. प. महाळुंगे शाळेत झाले. त्यानंतर पुढील शिक्षण त्यांनी फणसगाव व कासार्डे येथे घेतले. त्यांना लहानपणापासून शेतीची आवड असल्याने २०१८ मध्ये कुडाळ तालुक्यातील मुळदे येथील उद्यान विद्या महाविद्यालयात कृषी विषयात पदवी प्राप्त केली. तसेच २०२१ मध्ये पंजाब – लुधीयाना येथील कृषी विशवविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर सन २०२३ मध्ये हरियाणा राज्यातील चंदिगड – पंचकुला येथे हरियाणा लोकसेवा आयोगाची परिक्षा दिली त्यात ते उत्तीर्ण होऊन गुणवत्तेवर नुसार त्याची हरियाणा येथे उद्यान विकास अधिकारी ( हॉर्टीकल्चर डेव्हलपमेंट ऑफिसर ) पदी निवड झाली आहे. सध्या त्यांचे हरियाणात प्रशासकीय कारभाराबाबत प्रशिक्षण सुरु आहे. श्री. ओंकार राणे यांनी त्यांना मिळालेले यश हे जिद्द, चिकाटी व मेहनतीने तसेच आई – वडिलांच्या आशीर्वादाने व काका दिनेश राणे यांच्या मार्गदर्शनाने मिळाले असल्याचे सांगितले. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स