गांवच्या सर्वांगीण विकासासाठी कायम भाजपाच्या पाठीशी रहा : संदीप साटम.
शिरगांव | संतोष साळसकर : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खासदार निधीतून मंजूर असलेल्या देवगड तालुक्यातील साळशी – देवणेवाडी रस्त्याचे डांबरीकरण या विकासकामाचे भूमिपूजन माजी प.स.सदस्य सुनील गावकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी सांगितले की भाजपच्या माध्यमातून ग्राम विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असून गांवच्या सर्वांगीण विकासासाठी कायम भाजपच्या पाठिशी रहा असे मत व्यक्त केले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खासदार निधीतून या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, भाजपचे शिरगांव विभागीय अध्यक्ष राजेंद्र शेट्ये, माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य वैभव साळसकर, माजी प. स. सदस्य सुनील गांवकर, माजी सरपंच सत्यवान सावंत, माजी उपसरपंच राजेंद्र साटम, रविकांत सावंत, प्रविण राणे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रस्त्याचे डांबरीकरण होत असल्यामुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)