माऊली मित्रमंडळाच्या वतीने कणकवली पटवर्धन चौक येथील रिक्षा स्टँड नंबर १ येथे पाणपोई.
सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर आणि माऊली मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर यांच्या हस्ते पाणपोईचे उद्घाटन.
कणकवली | प्रतिनिधी : माऊली मित्रमंडळाच्या वतीने कणकवली पटवर्धन चौक येथिल रिक्षा स्टँड नंबर १ येथे पाणपोईचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर आणि माऊली मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतेच संपन्न झाले. यावेळी कणकवली रिक्षा स्टँड नंबर १ चे चालक मालक मोठ्या संख्येने भागी झाले होते. या पाणपोई उद्घाटन प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर म्हणाले की रिक्षावाला म्हणजे आजचा एक समाजसेवक आहे. तो प्रत्येकाला मदत करू शकतो. रिक्षावाला आज कणकवलीत प्रत्येक ठिकाणीं किंवा जिल्ह्यातील असतील तर रिक्षावाला ही अशी आधुनीक सामाजिक कार्याची संकल्पना आहे.
सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर, सुभाष उबाळे, अविनाश गावडे भगवान कासले प्रभाकर कदम, प्रसाद उगवेकर लक्ष्मण महाडिक, प्रसाद पाताडे, योगेश रंगराव पवार , ज्ञानदेव मोडक, संतोष चव्हाण, बाबुराव घाडीगावकर, हेमंत नाडकर्णी, विशाल रजपूत, सईद नाईक जमिल कुरैशी, नुरमहम्मद शेख , देवराज जाधव, पंडित करंबेळकर, ऑटो रिक्षा चालक अध्यक्ष गजानन लाड ,उपाध्यक्ष संदीप कदम ,खजिनदार मंगेश सावंत, सल्लागार भगवान दळवी , सचिव असिफ बागवान, आदी माऊली मित्र मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
आम्ही रिक्षा व्यवसायातून पुढे आलो आहोत. आज नाना विविध क्षेत्रात तुमच्याच आशीर्वादाने कार्यक्रम करत असल्याचे माऊली मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर यांनी मनोगत व्यक्त केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)