कणकवलीत प. पू. भालचंद्र महाराज समाधीस्थळी खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त महाविकास आघाडीच्या वतीने विजयी संकल्प अभिषेक.
कणकवली | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त महाविकास आघाडीच्या वतीने कणकवली येथे प. पू. भालचंद्र महाराज यांच्या समाधीस्थळी विजयी संकल्प अभिषेक करण्यात आला. खासदार विनायक राऊत यांना दीर्घायुष्य लाभो व ते पुन्हा खासदार म्हणून भरघोस मतांनी निवडून यावेत, असे साकडे महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी घातले.
यावेळी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, शिवसेना नेते सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला आघाडी प्रमुख नीलम सावंत पालव, आपचे जिल्हाप्रमुख विवेक ताम्हणकर, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर, शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव, शहर प्रमुख प्रमोद मसुरकर, युवासेना शहर प्रमुख आदित्य सापळे, माजी नगरसेवक कन्हैया पारकर, जयेश धुमाळे, सचिन आचरेकर, सुदाम तेली, अनुप वारंग, महेश कोदे, धीरज मेस्त्री, रूपेश आमडोस्कर, सचिन खोचरे, विलास गुडेकर, माधवी दळवी, साक्षी आमडोस्कर, धनश्री मेस्त्री, संजना कोलते, योगेश मुंज प्रद्युम मुंज, किरण वर्दंम, संतोष पुजारे, रोहित राणे, आर चव्हाण आदी उपस्थीत होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)