ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मुंबई इंडियन्स (MI) ज्युनियर टुर्नामेंट मध्ये सिंधुदुर्गचा सुपुत्र कु. श्लोक सत्यवान नर याचे निर्णायक शतक..!

मुंबई इंडियन्स (MI) ज्युनियर टुर्नामेंट मध्ये सिंधुदुर्गचा सुपुत्र कु. श्लोक सत्यवान नर याचे निर्णायक शतक..!

प्रकाशन: 01 Mar 2024 12:53 AM
वाचन संख्या 119

तरेळे | निकेत पावसकर : मुंबई येथील आझाद मैदान येथे नुकत्याच झालेल्या १४ वर्षांखालील एम. आय. ज्युनियर टुर्नामेंट मध्ये मूळचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या कुणकवण येथील कु. श्लोक सत्यवान नर याने चमकदार कामगिरी केली. बालमोहन विद्यामंदिर इंग्रजी माध्यम, दादर शाळेच्या कु. श्लोक नर याने रायन इंटरनॅशनल स्कूल, नेरुळ विरुद्ध शतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. कु. श्लोक याची ६३ चेंडूत १६ चौकार व एका षटकार सहीत १०४ धावांची खेळी त्याच्या संघासाठी निर्णायक ठरली. यापूर्वीही त्याने ८३, ६३, १०४ अशा खेळींची कामगिरी करत शालेय स्तरावर फलंदाजीची चुणूक दाखवली आहे. या खेळीबद्दल त्याचे शालेय प्रशिक्षक अदित्य कदम, गणेश मोरे, प्रदीप चव्हाण, निखिल आजगावकर यांनी अभिनंदन केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मूळ कुणकवणच्या कु. श्लोक सत्यवान नर याचे जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स