ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आंगणेवाडी जत्रोत्सवासाठी जिल्हा प्रशासनाचा अलर्ट मोड ; प्रांताधिकाऱ्यांनी घेतला जत्रा नियोजनाचा आढावा.

आंगणेवाडी जत्रोत्सवासाठी जिल्हा प्रशासनाचा अलर्ट मोड ; प्रांताधिकाऱ्यांनी घेतला जत्रा नियोजनाचा आढावा.

प्रकाशन: 29 Feb 2024 11:35 PM
वाचन संख्या 105

मसुरे | प्रतिनिधी : दक्षिण कोकणचे प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा जत्रोत्सव २ मार्च रोजी संपन्न होत आहे.  प्रशासनाकडून यात्रेकरू भाविकांना दिल्या जाणाऱ्या सुविधांबद्दल कुठेही कमी राहू नये यासाठी प्रत्येक विभागाने जबाबदारीने काम करावे. प्रत्येक विभागाच्या माध्यमातून केल्या गेलेल्या उपाय योजनांची माहिती लेखी स्वरूपात  महसूल प्रशासनाला द्यावी असे प्रतिपादन प्रांताधिकारी ऐश्वर्या कोळूशे यांनी आंगणेवाडी येथे केले. आंगणेवाडी जत्रेच्या पार्श्वभूमीवर  विविध प्रशासकीय विभागाच्या वतीने केलेल्या कामांची माहिती बुधवारी आंगणेवाडी येथे प्रांताधिकारी यांनी घेतली. यावेळी तहसीलदार वर्षा झाल्टे, मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे, मधुकर आंगणे, बाळा आंगणे, काका आंगणे, बाबू आंगणे यांसह विविध प्रशासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

गुरुवारपासून तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार असून बिळवस ग्रामपंचायतच्या वतीने सुद्धा प्रत्येक घरी  नळ योजनेद्वारे  पाणी पोहोचेल अशी योजना पूर्णत्वास जात आहे अशी माहिती ग्रामसेवक युगल प्रभुगावकर यांनी दिली. भाविकांसाठी स्वच्छता गृहांचे काम सुद्धा पूर्ण झाले आहे. आरोग्य विभागाच्या वतीने मंदिर परिसर आणि प्राथमिक शाळा येथे आरोग्य पथक तैनात असणार आहे. अशी माहिती डॉ जाधव यांनी दिली. ग्रामस्थांसाठी चार रुग्णवाहिकांची मागणी यावेळी बाबू आंगणे यांनी केली. छोट्या टँकर द्वारे वाडीत पाणी पुरवठा करण्याची मागणी अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी केली. जादा यात्रा स्पेशल रेल्वेच्या वेळे नुसार एसटी उपलब्ध  ठेवण्याचे निर्देश प्रांताधिकारी यांनी एसटी प्रशासनाला दिले. 

बीएसएनएल कडून १ मुख्य टॉवर सोबत आणखी २ छोटे टॉवर कार्यन्वित झाले असून  आवश्यक त्या ठिकाणी मागणी नुसार इंटरनेट कनेक्शन बीएसएनएल च्या वतीने देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. तलाठी कार्यालय इमारत बांधताना बहु उद्देशीय बांधावी अशी मागणी भास्कर आंगणे यांनी केली. जोडरस्त्यावर दिशादर्शक उभारण्याचे निर्देश प्रांताधिकारी यांनी दिले.आंगणेवाडी ते बिळवस फाटा स्ट्रीट लाईट काम पूर्ण झाल्या बद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. 

यावेळी  ऍड. दिनेश आंगणे, मंडळ अधिकारी मीनल चव्हाण, बाब्या आंगणे, तनुराज आंगणे, गणेश आंगणे, पंकज आंगणे, नंदू आंगणे, सार्व. बांधकाम विभाग अभियंता अजित पाटील, तुषार एरोंडे, सहा बीडीओ मुकेश सजगाणे, ल पा विभागाचे वैभव वाळके, आरोग्य अधिकारी डॉ एस बी जाधव, प्रकाश कात्रे, अभियंता अतुल माने, आरोग्य विभागाचे सूरज बन्सर, बीएसएनएलचे प्रवीण कवाडे, प्रकाश सरगर, ग्रामसेवक युगल प्रभुगावकर, तलाठी श्री चव्हाण, सहा. पोलीस निरी. संजय आंबेरकर,  कैलास ढोले, प्रमोद नाईक, विवेक फरांदे, एसटीचे स्वप्नील कवाडे, आदी उपस्थित होते.

जत्रेसाठी व्यापाऱ्यांनी हंगामी वीज जोडणी घेताना सिंगल फेजला ४ हजार, थ्री फेज ला ६ हजार रुपये डिपॉझिट घेतले जाते. हा दर कमी करावा अशी मागणी बाबू आंगणे यांनी केली. तसेच मागील जत्रेचा परतावा सुद्धा होणे बाकी असल्याने ही रक्कम त्या व्यापाऱ्यांची त्वरित परत मिळावी अशीही मागणी करण्यात आली. जत्रोत्सव संपल्या नंतर सदर रक्कम आंगणेवाडी येथे व्यापाऱ्यांना परत केली जाईल अशी माहिती वीज वितरण कडून देण्यात आली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 305

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स