कुडाळ - मालवण तालुक्यांना जोडणार्या बाव - तळगाव - सुकळवाड प्रजिमा २७ ब्रिजसाठी निधी मंजूर .
मालवण | ब्यूरो न्यूज : कुडाळ व मालवण तालुक्यांना जोडणारा बाव – तळगाव येथील कर्ली खाडीवर नवीन पुलासाठी ( प्रजिमा २७ कर्ली खाडी ब्रिज)मिळाली आहे. अर्थअंकल्पात या पुलासाठी एकूण १७ कोटी ८ लक्ष एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधी उपलब्धतेमुळे आता भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
कुडाळ व मालवण तालुक्यांना जोडणाऱ्या बाव – तळगाव सुकळवाड प्रजिमा २७ कर्ली खाडीवरील या ब्रिजसाठी निधी मिळावा यासाठी केंद्रीय मंत्री श्री. नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे यांच्याकडे ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, भाजपा मालवण तालुका अध्यक्ष श्री. धोंडी चिंदरकर व अन्य भाजपा पदाधिकारी यांनी पाठपुरावा केला होता. त्यानुसार पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी अर्थसंकल्पात या निधीची तरतूद केली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)