ओझर विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांना झाले सॅनिटायझरचे वाटप..!
मालवणचे नगरसेवक दीपक पाटकर यांच्या माध्यमातून निरामय समाजसेवा
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : मालवणचे नगरसेवक दिपक पाटकर यांनी दिलेल्या सॅनिटायझर बॉटलचे वाटप ओझर विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांना नुकतेच करण्यात आले. सर्व विद्यार्थ्याना सॅनिटायझर बॉटल उपलब्ध व्हावी म्हणून संस्था संचालक माजी सभापती उदय परब यांनी मागणी केली होती. ग्रामीण भागातील कोरोनाची गांभिर्यता लक्षात घेऊन नगरसेवक पाटकर यांनी परब यांना तातडीने सॅनिटायझर बॉक्स सुपूर्द केला. यावेळी स्थानिक समिती अध्यक्ष किशोर नरे, मुख्याध्यापक प्रताप खोत, मुंबई संचालक माजी सभापती उदय परब, सत्यवान राणे, समिती सदस्य रणजित परब,प्रवीण पारकर, पांडुरंग राणे, अभय शेर्लेकर, डि डि जाधव, शिवराम सावंत, नितीन परुळेकर, भास्कर पाताडे, रवीराज जाधव, प्रकाश खोडके, माजी विद्यार्थी विशाल राणे आदी उपस्थित होते. सॅनिटायझर वाटपाबद्ल सर्वांनी नगरसेवक दीपक पाटकर यांचे आभार मानले. पांडुरंग राणे यांनी विद्यार्थ्यांना वापराबाबत मार्गदर्शन केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)