चिंदर,तेरई येथे १९ ऑक्टोबरला रंगणार जंगी डबलबारी !
गावच्या तेरई तरुण सेवा मंडळाचा सत्यनारायण महापूजेनिमित्त कार्यक्रम….
चिंदर | विवेक परब : यंदा कोजागिरी पौर्णिमे निमित्त चिंदर तेरईवाडी जिल्हा परिषद शाळा येथे १९ ऑक्टोबर रोजी आमने सामने डबल बारी भजन सामना सायंकाळी ९ वाजता होणार आहे. सुप्रसिद्ध बुवा श्री.समीर कदम (पोखरण ता. कुडाळ) विरुद्ध शैलीदार बुवा दुर्वास गुरव ( परेल, मुंबई ) या दोहोंच्यात हा सामना होणार आहे. कदम यांना पखवाज सागर कदम, तर गुरव यांना पख़वाज नितीन घाडी, तबला तुषार शिंदे साथ करणार आहेत. या डबलबारीचा व तीर्थप्रसादाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)