बांदीवडे गांवच्या सुनीता प्रभू नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित....!
श्रीमती प्रभूंच्या समाजकार्याची घेतली गेली उचित् दखल
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : लोकमान्य मल्टी पर्पज को ऑपरेटिव्ह बँक, शाखा आचरा यांचे वतीने नवदुर्गा सन्मान उपक्रमांतर्गत बांदिवडे येथील सामाजिक कार्यकर्त्या श्रीम. सुनिता गोविंद प्रभू यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शाखेचे व्यवस्थापक श्री मोरवेकर, श्रीम. अस्मिता गावकर, हिमानी परब, श्री विनोद आचरेकर, श्री मिराशी , श्री संजीव प्रभू, देशमुख सर, संजय जोशी, विश्वनाथ परब, श्रीम, प्रभू मॅडम यांचे कुटुंबीय उपस्थित होते. शाखेच्या वतीने श्रीम, प्रभू यांचा शाल, श्रीफळ व सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला. आपल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन पुरस्कार दिल्याबद्दल सुनीता प्रभू यांनी आभार मानले.प्रास्ताविक श्री मोरवेकर यांनी आभार विश्वनाथ परब यांनी मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)