कुवळे - रेंबवली येथील किरण खरात याची अग्नीवीर म्हणून सैन्यात निवड.
शिरगांव | संतोष साळस्कर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या कुवळे – रेंबवली( धनगरवाडी) येथील किरण संतोष खरात यांची अग्नीवीर म्हणून इंडियन आर्मीत ( भारतीय सैन्यात) निवड झाली आहे. किरण खरात यांचे प्राथमिक शिक्षण साळशी येथे झाले. माध्यमिक शिक्षण कुवळे येथे घेतले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण सुरु असतानाच सन २०२० मध्ये ओरस येथील एका करिअर अकॅडमीतआर्मी भरतीपूर्व प्रशिक्षण घेतले. त्याने एप्रिल २०२३ मध्ये कोल्हापूर येथे इंडियन आर्मीपदासाठी आवश्यक असलेली लेखी परिक्षा व डिसेंबर मध्ये मैदानी परिक्षा दिली. त्या परिक्षेत तो उत्तीर्ण झाला असून त्याची निवड भारतीय आर्मीत अग्नीवीर म्हणून निवड झाली आहे. यासाठी त्याला त्याचे आई- वडिल व काका यांनी प्रोत्साहन दिले. किरण खरात यांचे आई – वडिल शेतकरी आहेत. किरणच्या भारतीय सैन्यातील निवडीबद्दल त्यांना आनंद झाला आहे. किरण खरात याचे लहानपणीच आर्मीत जाऊन देशसेवा करण्याचे स्वप्न होते. त्याच्या निवडीबद्दल साळशी व कुवळे-रेंबवली ग्रामवासीयांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)