ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक गटातून गणेश नाईक यांचे सुयश.

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक गटातून गणेश नाईक यांचे सुयश.

प्रकाशन: 25 Feb 2024 08:37 PM
वाचन संख्या 68

शिरगांव | संतोष साळसकर : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (पुणे) अंतर्गत संशोधन विभागामार्फत आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२३-२४ मध्ये मालवण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेंडूर – खरारे येथील प्राथमिक शिक्षक गणेश नाईक यांनी आठवा क्रमांक पटकाविला. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संशोधन विभागामार्फत पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेच्या प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक गटातून गणेश नाईक यांनी हे यश मिळविले. यावर्षी जिल्हास्तरावर झालेल्या नवोपक्रम स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेंडूर खरारे येथील गणेश नाईक यांचा ततीय क्रमांक आला होता. जिल्हास्तरावरील पहिल्या पाच स्पर्धकांची निवड पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी करण्यात आली होती. या स्पर्धेच्या प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक या गटात राज्यभरातून १८० स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. यात गणेश नाईक यांच्या ‘वाचू आनंदे’ या नवोपक्रमाचा आठवा क्रमांक आला. या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात पहिल्या दहा क्रमांकांचा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्यावतीने पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. या नवोपक्रमासाठी गणेश नाईक यांना डॉ. लवू आचरेकर आणि सुनील करडे यांचे मार्गदर्शन लाभले. गणेश नाईक यांच्या या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य कांबळे यांनी अभिनंदन केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स