ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
मालवणात हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे भव्य आयोजन.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मालवणात हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे भव्य आयोजन.

प्रकाशन: 26 Feb 2024 04:08 PM
वाचन संख्या 92

मालवणवासिय व हिंदू प्रेमी यांचा एकत्रित स्वरूपातील उत्स्फूर्त सहभाग हेच या स्वागत यात्रेचे आपलेपण ; हिंदू नववर्ष यात्रा समन्वयक भाऊ सामंत यांची पहिल्या नियोजन बैठकीनंतर माहिती.

मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरात गुढीपाडव्याला शहर बाजारपेठ मार्गांवरून निघणाऱ्या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे यावर्षी २० वे वर्ष आहे. दर वर्षी प्रमाणे हिंदूप्रेमी व मालवणवासीय यांच्या उत्स्फूर्त सहभागातून भव्य स्वरूपात हिंदू नववर्ष स्वागत यात्रा निघेल त्या दृष्टीने नियोजन सूरू करण्यात आले आहे. हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समन्वयक भाऊ सामंत यांनी ही माहिती दिली.

मालवण भरड येथील श्री दत्त मंदिर येथे हिंदू नववर्ष स्वागत यात्रा मालवण सदस्यांची पहिली नियोजन बैठक नुकतीच संपन्न झाली. यावेळी भाऊ सामंत, बंटी केनवडेकर, संदीप बोडवे, प्रशांत हिंदळेकर, अमित खोत तसेच अन्य सदस्य उपस्थित होते. ९ एप्रिलला गुढीपाडवा हिंदू नववर्ष स्वागत यात्रे निमित्त निघणाऱ्या या भव्य शोभयात्रेत महाराष्ट्रातील नामवंत झांज व ढोल पथक सहभागी असणार आहे.

सोबत घोडे, चित्ररथ, विविध वेशभूषा यांसह महाराष्ट्रीय संस्कृतीचे दर्शन विविध गृपसच्या माध्यमातून केले जाणार आहे. भगव्या उत्साहातील भव्यदिव्यता हिंदू नववर्ष स्वागत यात्रा प्राथमिक स्तरावर झांज व ढोल पथक यांच्यासोबत चर्चेची जबाबदारी बंटी केनवडेकर, भाऊ सामंत, संदीप बोडवे, अमित खोत यांच्याकडे देण्यात आली आहे. तर बॅनर, पत्रके, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र स्वरूप निश्चितीसाठी भाऊ सामंत, अमित खोत, प्रशांत हिंदळेकर यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. यात अन्य सदस्य यांनाही पुढील बैठकीत सहभागी केले जाणार आहे. तसेच चित्ररथ, वेशभूषा, महाराष्ट्रीय संस्कृती दर्शन याबाबत पुढील बैठकीत समिती सदस्य यांना जबाबदारी देण्यात येणार आहे. हिंदू नववर्ष स्वागत यात्रा सर्व सदस्य यांची पुढील बैठक ५ मार्च सायंकाळी ४ वा. भरड दत्त मंदिर येथे होणार आहे. सर्व सदस्य यांच्या एकत्रित चर्चेतूनच कार्यक्रमाचे स्वरूप निश्चित केले जाणार आहे. मालवण वासिय हिंदू प्रेमी यांचा एकत्रित स्वरूपातील उत्स्फूर्त सहभाग हेच या स्वागत यात्रेचे आपलेपण असल्याचे भाऊ सामंत यांनी सांगितले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स