ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
मसुरे देऊळवाडा शाळा मालवण तालुक्यात प्रथम ; मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मसुरे देऊळवाडा शाळा मालवण तालुक्यात प्रथम ; मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान.

प्रकाशन: 25 Feb 2024 08:31 PM
वाचन संख्या 136

मसुरे | प्रतिनिधी : राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, , विद्यार्थी यांच्या शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी आणि स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” हे अभियान संपूर्ण राज्यभर राबविण्यात येत आहे. या अभियानामध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, मसुरे देऊळवाडा या शाळेने शैक्षणिक गुणवत्ता, भौतिक सुविधा, प्रशासकीय नियोजन, लोकसहभाग, कौशल्य विकास व व्यवसाय शिक्षणाची तोंड ओळख, पर्यावरण संवर्धन, सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता, चांगले आरोग्य, राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत करणे, अंगभूत कला क्रीडा गुणांचा विकास इत्यादी घटकांमध्ये उत्तम कामगिरी करत मालवण तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. या शाळेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रोख तीन लाख रुपये पारितोषिक व गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेचे मूल्यमापन गटविकास अधिकारी श्री. आत्मज मोरे, गटशिक्षणाधिकारी श्री. संजय माने यांच्या समितीने केले. यावेळी प्रशालेत राबविलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.

तालुकास्तरीय मूल्यमापनानंतर या शाळेचे जिल्हास्तरीय मूल्यमापन शिक्षणाधिकारी प्राथमिक व डायट सिंधुदुर्ग यांच्या मूल्यमापन समितीने केले. या अभियानाच्या यशस्वीततेसाठी शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक संघ, माता संघ, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी, सेवाभावी संस्था, शिक्षक, मुख्याध्यापक व विद्यार्थी, ग्रामपंचायत देऊळवाडा खेरवंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

शाळेच्य या उत्तुंग यशाबद्दल मालवण तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी श्री. संजय माने, केंद्रप्रमुख श्री. नारायण देशमुख, माजी पंचायत समिती सदस्य श्री. महेश बागवे, सरपंच श्रीम. सुरेखा वायंगणकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. सदानंद कबरे, उपाध्यक्षा सौ. विद्या लाकम, मुख्याध्यापक श्री. प्रशांत पारकर, शिक्षक गुरुनाथ ताम्हणकर, तेजल ताम्हणकर, कविता सापळे, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स