ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
चाफेड सरपंच किरण मेस्त्री यांनी दिले देवगड एस टी विभागाला लेखी निवेदन.

चाफेड सरपंच किरण मेस्त्री यांनी दिले देवगड एस टी विभागाला लेखी निवेदन.

प्रकाशन: 02 Feb 2024 07:25 AM
वाचन संख्या 147

शिरगांव संतोष साळसकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या चाफेड गांवचे सरपंच किरण मेस्त्री यांनी देवगड एस टी विभागाला लेखी निवेदन दिले. देवगड आगारातून सुटणाऱ्या देवगड चाफेड भोगलेवाडी येथे येणाऱ्या बस फेऱ्या या भरणी तांबळवाडी फाटा पर्यंत विस्तारित करण्यात याव्यात कारण चाफेड भोगले वाडी पासून भरणी पर्यंत शाळेतील मुलांना वृद्धांना आजारी व्यक्तींना पायी प्रवास करावा लागतो. तसेच चाफेड गावची बादेवाडी हि एका बाजूला असल्याने तेथील प्रवाशांना भोगले वाडी येथे पायी यावे लागते. तसेच कुवळे मार्गावर दुपारी १२.३० वा. सुटणारी शिरगांव रेबवली बस सुरु असल्याने देवगड आगारातून दुपारी १२.१५ वाजता सुटणारी देवगड कुवळे मार्गे चाफेड येणारी बस फेरी मार्ग कुवळे न करता देवगड चाफेड पर्यंत सुरु करण्यात यावी. दरम्यान तसे झाल्यास चाफेड ग्रामस्थांची मोठी गैरसोय होणार नाहीतरी सदर बस फेरी नियमित सुरु करून मिळावी अशी मागणी सरपंच किरण मेस्त्री यांनी केली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स