ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
बांदिवडेत गुणवंतांचे सत्कार आणि बांदिवडे प्रतिष्ठान मुंबई अध्यक्ष श्री. सोनू सावंत यांच्या वतीने साहित्य वाटप.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

बांदिवडेत गुणवंतांचे सत्कार आणि बांदिवडे प्रतिष्ठान मुंबई अध्यक्ष श्री. सोनू सावंत यांच्या वतीने साहित्य वाटप.

प्रकाशन: 02 Feb 2024 12:40 AM
वाचन संख्या 77

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या बांदिवडे येथील श्री देवी पावणाई भगवती मंदिर येथे दुसऱ्या वार्षिक गोंधळ कार्यक्रमाचे औचित्य साधून दहावी व बारावी परीक्षा गुणवंत विध्यार्थी, तसेच अंगणवाडी ते दहावी पर्यंतच्या विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप माध्यमिक शिक्षक सोनू सावंत यांच्या वतीने करण्यात आले. मुंबई येथील ज्ञानसागर विद्यालयाचे शिक्षक व बांदिवडे प्रतिष्ठान मुंबई अध्यक्ष सोनू सुधाकर सावंत यांच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दहावी व बारावी गुणवंत विध्यार्थ्यांसह त्यांच्या आई – वडिल यांचा सत्कार करण्यात आला. बांदिवडे येथील शर्वरी प्रशांत परब हिची राज्य हॉलीबॉल संघात निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी विश्वनाथ परब यांनी सोनू सावंत यांच्या दातृत्वा बद्दल आभार मानताना सावंत सर यांचे दातृत्व आदर्शवत असल्याचे सांगितले.

यावेळी उद्योजक डॉ दीपक परब, सरपंच आशु मयेकर, उपसरपंच पुष्पक घाडी, सदस्य नारायण परब, स्वप्नील मुणगेकर, श्री. साई प्रभु, प्रफुल्ल प्रभू, आप्पा गोविंद परब, उद्योजिका सौ राधिका परब, जयेश परब, दिनेश परब, मधुकर परब, आनंद परब, नारायण परब, चंद्रकांत परब, सागर परब, अनिल परब, मनोहर परब, उदय सावंत, आबा आईर, पोलीस पाटील नरेश मसुरकर, राजेंद्र परब,जगन्नाथ परब, शिवराम परब, वासुदेव सावंत, अशोक परब, प्रवीण परब, प्रथमेश नाईक, राजेश दळवी सिताराम परब, प्रकाश परब, लाडोबा परब, प्रवीण परब, के.के. सावंत, प्रतीक परब, नरेंद्र जाधव, नयन भट, विनय सावंत, नितीन परब, अशोक परब, उल्हास परब, चंद्रशेखर परब, रमेश परब, गणपत सावंत, अनुराधा गावकर, प्रशांत परब, उदय परब, विकास भट, मंगेश चव्हाण, यशवंत परब, उत्तम परब, शैलेश राणे, सुधीर घाडी आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन विश्वनाथ परब तर आभार आनंद परब यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स