ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मालवणात ह्यूमन राईटस् असोसिएशन फाॅर प्रोटेक्शनच्या जिल्हास्तरीय मेळाव्याचे भव्य आयोजन ; मार्गदर्शनपर कार्यशाळासुद्धा मेळाव्यात विशेष सामिल असल्याची कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांची माहिती.

मालवणात ह्यूमन राईटस् असोसिएशन फाॅर प्रोटेक्शनच्या जिल्हास्तरीय मेळाव्याचे भव्य आयोजन ; मार्गदर्शनपर कार्यशाळासुद्धा मेळाव्यात विशेष सामिल असल्याची कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांची माहिती.

प्रकाशन: 02 Feb 2024 04:00 PM
वाचन संख्या 213

सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले, ग्राहक न्यायालयाचे माजी अध्यक्ष ॲड. राजेंद्र पैलवान आणि पद्मश्री परशुराम गंगावणे असे दिग्गज रहाणार उपस्थित.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ह्यूमन राईटस् असोसिएशन फाॅर प्रोटेक्शनचे विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांनी मालवणमधील कोळंब येथे ह्यूमन राईटस् असोसिएशन फाॅर प्रोटेक्शनच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दिली आहे. ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुका व जिल्हा संघटनेचे पदाधिकारी व सदस्य यांचा जिल्हास्तरीय भव्य मेळावा व मार्गदर्शन कार्यशाळा रविवार ४ फेब्रुवारीला मालवणजवळील कोळंबच्या समर्थ मंगल कार्यालय येथे संपन्न होणार आहे.

या मेळाव्याचे उद्घाटन सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ग्राहक न्यायालयाचे माजी अध्यक्ष ॲड. राजेंद्र पैलवान तर प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री परशुराम गंगावणे, एम.एस.ई.बी.मेडिक्लेम विभाग प्रमुख डॉ. अमोल धर्मजिज्ञासू, मालवण तहसीलदार वर्षा झालटे – भोसले, देवगड तहसीलदार आर.जे.पवार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार काळे, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, सागरी सुरक्षा शाखेचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर तसेच संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष खंडूदेव कठारे, राष्ट्रीय सचिव प्रमोद केसरकर, महाराष्ट्र राज्य निरिक्षक घन:श्याम सांडीम, राज्य सचिव राकेश शिंदे, कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मंदार काणे असे दिग्खज मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या सर्व तालुक्यांचे तसेच जिल्हा संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांनी या जिल्हास्तरीय भव्य मेळावा व मार्गदर्शन कार्यशाळेला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे आणि जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेत स्वयंसेवीपणे योगदान देण्यास इच्छुक असणाऱ्या जिल्ह्यातील व्यक्तींनी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंदार काणे किंवा कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांच्याशी संपर्क साधून उपस्थित रहावे असेही आवाहन संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक ( संपर्क: ९४०५२८८१८८ /९१४६२८८१८) यांनी केले आहे

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 297

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स