ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
चांदोशी येथे शालेय विद्यार्थ्यांनी घेतले संस्काराचे धडे.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

चांदोशी येथे शालेय विद्यार्थ्यांनी घेतले संस्काराचे धडे.

प्रकाशन: 23 Jan 2024 06:16 AM
वाचन संख्या 35

मिठबाव | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या चांदोशी येथील श्री भवानी मंगल कार्यालय येथे नुकतेच ३ दिवसीय निवासी विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास शिबीर संपन्न झाले. सेवा भारती कोकण प्रांत, सिंधुदुर्ग जिल्हा फिरती विज्ञान प्रयोगशाळा प्रकल्प देवगड यांनी सदर व्यक्तिमत्त्व विकास शिबीर आयोजित करण्यात आले होते. या तीन दिवसीय निवासी शिबिरात देवगड तालुक्यातील १८ जि. प. शाळांतील ८८ मुली व ५६ मुलगे असे एकूण १४४ शिबिरार्थी पूर्णवेळ सहभागी झाले होते.

या शिबिरामध्ये विज्ञान व राष्ट्रभक्ती या विषयांवर ९ बौद्धिक सत्रे व ४ शारीरिक सत्रे आयोजित करण्यात आली होती. या शिबिरात भारतमाता पूजनाचा विशेष लक्षवेधी कार्यक्रम पार पडला. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. श्री. किरण हिंदळेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या शिबिरात श्री. आनंद राजम, शिबीर कार्यवाह, श्री. सुरेंद्र शर्मा, संघटन मंत्री, सेवा भारती कोकण प्रांत, आणि श्री. हेमंतजी आईर प्रयोगशाळा विषय प्रमुख, सेवा भारती कोकण प्रांत हे पूर्णवेळ उपस्थित होते. या शिबिराला श्री. विलास तावडे, मा. अध्यक्ष, सेवा भारती कोकण प्रांत, श्री. धनंजय जठार, शिक्षण आयाम प्रमुख, सेवा भारती कोकण प्रांत, श्री. महेशजी कानेटकर, कार्यवाह, रा.स्व.संघ, देवगड तालुका, ॲड. श्री. अजितराव गोगटे, माजी उपाध्यक्ष रा.स्व. संघ जनकल्याण समिती, कोकण संभाग यांनी भेट दिली. तसेच ४९ पालक, शिक्षक, हितचिंतक, देणगीदार यांनी सदिच्छा भेट दिली. ह्या यशस्वी प्रयोगशाळा प्रकल्पाचे २७ माजी विद्यार्थी, प्रकल्प समिती सदस्य, जिल्हा समिती सदस्य यांनी परिश्रम घेतले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स