ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मालवण तालुक्यात हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या ९८ व्या जयंती निमित्त सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन : शिवसेना ( उ बा ठा ) तालुकाप्रमुख हरी खोबरेकर.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मालवण तालुक्यात हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या ९८ व्या जयंती निमित्त सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन : शिवसेना ( उ बा ठा ) तालुकाप्रमुख हरी खोबरेकर.

प्रकाशन: 16 Jan 2024 02:37 PM
वाचन संख्या 108

तालुका प्रमुख हरी खोबरेकर व शहर प्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी यांचे रक्तदान शिबिरातील सहभागासाठी शिवसैनिक व दातृत्वशिल रक्तदात्या नागरीकांना शिवसेनेच्या वतीने विशेष आवाहन.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुका शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित ) तालुका प्रमुख व माजी जि प सदस्य हरी खोबरेकर यांनी, हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या व्या जयंती निमित्त २३ जानेवारीला होत आहे मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तालुक्यात ९८ सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक उपक्रम राबवले जाणार आहेत अशी माहिती दिली आहे.

शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) तालुका प्रमुख हरी खोबरेकर.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती उपक्रमांचा आरंभ मालवण येथील रक्तदान शिबिराने होणार आहे.

शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) शहर प्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी. ( मालवण शहर )

मालवण येथील माजी नगरसेवक व शिवसैनिक (उद्धव बाळासाहेब ठाकरे) लीलाधर पराडकर व आतु फर्नांडिस यांच्या स्मरणार्थ शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे मालवण यांच्या वतीने १८ जानेवारीला भव्य रक्तदान शिबीर मामा वरेरकर नाट्यगृह येथे सकाळी ८ ते ११ या वेळेत संपन्न होईल. शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडी सदस्य व युवती सेनेच्या कार्यकर्त्यांनी आणि दातृत्वशील रक्तदाते नागरीक यांनी उपस्थित राहावे असे विशेष आवाहन मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर, शहर प्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स