ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
ग्रामपंचायत करूळ व श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्ट सिंधुदुर्ग अँड श्री माऊली क्लिनिकल लॅबोरेटरी वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कौशल्य विकास व आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

ग्रामपंचायत करूळ व श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्ट सिंधुदुर्ग अँड श्री माऊली क्लिनिकल लॅबोरेटरी वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कौशल्य विकास व आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

प्रकाशन: 04 Jan 2024 01:41 PM
वाचन संख्या 24

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या ग्रामपंचायत करूळ व श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्ट सिंधुदुर्ग अँड श्री माऊली क्लीनिकल लॅबोरेटरी वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या १५ वा वित्त आयोग कौशल्य विकास व्यावसायिक प्रशिक्षण व आरोग्य शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराचे उद्घाटन माजी सरपंच कर्णिक यांच्या शुभहस्ते करण्यात आला यावेळी गावच्या सरपंच समृद्धी नर, उपसरपंच पुरुषोत्तम तानावडे, ग्रामपंचायत सदस्य शिवराम शिंदे ग्रामपंचायत सदस्या रिया धवन ग्रामसेविका नयना मिठबावकर प्रशिक्षक स्नेहा कामत व इतर ग्रामपंचायत सदस्य महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सदर आरोग्य शिबिरामध्ये महिलांची संपूर्ण हिमोग्राम (CBC) कॅल्शियम शुगर,प्रोटीन, अल्बुमीन या सर्व तपासण्या करण्यात आल्या .

कौशल्य विकास निधीतून महिलांना निळ फिनोल, वॉश,वॉशिंग पावडर बनविणे व विविध प्रकारचे मसाले बनवणे यांचा सारखे व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात आले.उपस्थित महिलांना प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र चहा नाष्टा व जेवण देण्यात आले. १५ व्या वित्त आयोग मधून हा उपक्रम ग्रामपंचायत करूळ व श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्ट सिंधुदुर्ग अँड श्री माऊली क्लीनिकल लॅबोरेटरी वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला. या उपक्रमाची सर्व स्तरांतून प्रशंसा होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स