ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कुडाळातील २१ वर्षीय युवतीचा कोलगांव येथे भीषण अपघातात मृत्यू ; नूतन वर्षाच्या सुरवातीलाच सिंधुदुर्ग जिल्हा शोकाकूल.

कुडाळातील २१ वर्षीय युवतीचा कोलगांव येथे भीषण अपघातात मृत्यू ; नूतन वर्षाच्या सुरवातीलाच सिंधुदुर्ग जिल्हा शोकाकूल.

प्रकाशन: 01 Jan 2024 12:50 PM
वाचन संख्या 741

सावंतवाडी | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ पिंगुळी येथील २१ वर्षीय युवती ऐश्वर्या कवठणकर हिचा कोलगांव येथे अपघाती मृत्यू झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यावर नववर्षाच्या सुरवातीला शोककळा पसरली आहे. कोलगांव येथे नववर्षाच्या स्वागत कार्यक्रम आटपून सावंतवाडी येथून कुडाळला येताना आज पहाटे ५ च्या दरम्यानहा भयंकर अपघात घडला. दिवंगत ऐश्वर्या मित्र सिद्धार्थ बांदेकर हा त्याची मारुती सुझुकी कार चालवत होता तो यात जखमी झाला आहे आणि सोबतच्या अन्य दोन युवकांना दुखापत झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुडाळ येथील मित्र व त्यांची मैत्रीण असे चौघेजण कुडाळ येथून नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सावंतवाडीत आले होते. नव्या वर्षाचे स्वागत जल्लोषी केल्यानंतर सावंतवाडीतून घरी परतताना कोलगाव – आकेरी मार्गे कुडाळ येथे जात असताना पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास चालक
सिद्धार्थ बांदेकर यांची कार भल्या मोठ्या झाडाला आदळली आणि अपघात झाला.

या अपघाताची खबर कळताच सिद्धार्थ बांदेकरचे मामा राजू वाळके व त्यांच्या मित्रमंडळाने धाव घेत जखमी तरुणांना गाडीच्या बाहेर काढले. तर गाडीत असलेली कु. ऐश्वर्या कवठणकर हिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. गाडीमध्ये अडकल्याने या सर्वांना गाडी बाहेर काढण्यात आले. आणि पोलिसांच्या मदतीने सावंतवाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सावंतवाडी रुग्णालयात ऐश्वर्या कवठणकर हिचे वडील, काका व मित्रमंडळाने धाव घेतली. ऐश्वर्या कवठणकर ही कुडाळ येथे उत्कर्षनगर, रामेश्वर प्लाझा, पिंगुळी येथील रहिवासी . तिच्या पश्चात आई – वडील भाऊ व दोन काका काकी असा परिवार आहे. पोलीस अधिकारी गोते व मनोज राऊत हे अपघाताचा पुढील तपास करत आहेत. या घटनेने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यावर दुःखाचे सावट आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स