ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
विरोधी पक्षाच्या महिला सरपंचांना आमदार वैभव नाईक यांनी दिला विकास कामाच्या भूमीपूजनाचा सन्मान..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

विरोधी पक्षाच्या महिला सरपंचांना आमदार वैभव नाईक यांनी दिला विकास कामाच्या भूमीपूजनाचा सन्मान..!

प्रकाशन: 30 Dec 2023 07:01 AM
वाचन संख्या 161

कुडाळ | देवेंद्र गावडे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी कवठी गावातील गावकरवाडी येथे साकव बांधण्यासाठी ४५ लाख रु. मंजूर केले असून या कामाचे भूमिपूजन विरोधी पक्षाच्या महिला सरपंच स्वाती करलकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. कवठी गावातील सरपंच विरोधी पक्षाच्या आहेत तर उपसरपंच सहित बहुसंख्य सदस्य शिवसेनेचे आहेत. सरपंच विरोधी पक्षाच्या असल्या तरी यानिमित्ताने महिलांना सन्मान देण्याचा आदर्श आमदार वैभव नाईक यांनी घालून दिला आहे. सर्वांना सोबत घेऊन गावचा विकास करण्याच्या आ. वैभव नाईक यांच्या या कार्यप्रणालीबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

त्याचबरोबर आ. वैभव नाईक यांनी बजेट २०२०-२१ अंतर्गत कवठी अशांतवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे यासाठी २२ लाख रु. निधी मंजूर केला आहे. या कामाचे देखील भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी कवठी सरपंच स्वाती करलकर, उपसरपंच ऋतुजा खडपकर, माजी सरपंच रुपेश वाडयेकर, ग्रा. पं. सदस्य नंदकिशोर वाडयेकर, ममता वाडयेकर, उपविभागप्रमुख मंगेश बांदेकर, माजी उपसरपंच अरुण परुळेकर, शाखा प्रमुख गोपाळ कवठकर, अमृता पार्सेकर, दिलीप परुळेकर, रमेश परुळेकर, महादेव पावसकर,राजन खोबरेकर, रवींद्र गोडकर, सुरेश कवठकर, शरद कवठकर, संतोष वाडयेकर, महेश वाडयेकर, लवू वाडयेकर, प्रशांत बांदेकर, अनिल चिंचकर, आनंद परुळेकर, दादा गुरव,एकनाथ बांदेकर, दीपक सांगवे, प्रवीण वाडयेकर, रुपेश खडपकर, दामोदर करलकर, मधुकर खडपकर, सुहास परुळेकर, गणपत शिरगांवकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स