ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून पोईप, वडाचापाट, नांदोस गांवात अनेक विकास कामांची उद्घाटने व भूमीपूजने संपन्न.

आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून पोईप, वडाचापाट, नांदोस गांवात अनेक विकास कामांची उद्घाटने व भूमीपूजने संपन्न.

प्रकाशन: 30 Dec 2023 07:10 AM
वाचन संख्या 119

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी कट्टा, पोईप, वडाचापाट, नांदोस या गावात विकास कामांची खैरात केली असून या कामांची भूमिपुजने व उदघाटने गुरुवारी आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आली.संबंधित गावातील ग्रामस्थांना विकास कामे मार्गी लावण्याचा दिलेला शब्द आ. वैभव नाईक यांनी पूर्ण केला आहे. त्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत त्यांचे आभार मानले.

यामध्ये बजेट २०२०-२१ अंतर्गत नांदोस जोडरस्ता ( कट्टा समादेवी मंदिर ते नांदोस ग्रामपंचायत कार्यालय) ग्रा.मा ३३८ रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे निधी ९.५० लाख, कट्टा एसटी स्टॅण्ड ते गुरामवाड जाणारा रस्ता मजबुतीकरण डांबरीकरण करणे १९ लाख,नांदोस खोत दुकान ते बांधवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ६ लाख, पोईप खालची पालववाडी ते कुपवरे वाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख या कामांची भूमिपूजने तसेच पोईप मुंजेश्वर मंदिर जाणारा रस्ता निधी ५ लाख या कामाचे उदघाटन करण्यात आले.

त्याचबरोबर जि.प.शाळा वडाचापाट इमारत दुरुस्त करणे रक्कम २ लाख रु, वडाचापाट थळकरवाडी ग्रा.मा. १९९ खडीकरण व डांबरीकरण करणे ५ लाख रु.,वडाचापाट हायस्कूल ते चाफेखोल ग्रा.मा. ३९३ खडीकरण व डांबरीकरण करणे ५ लाख रु.,वडाचापाट शांतादुर्गा मंदिर ते पालव मांगर मार्ग ग्रा.मा. १९७ खडीकरण डांबरीकरण करणे १० लाख रु.,जि. प. शाळा वडाचापाट ते रवळनाथ मंदिर पर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख या कामांची उदघाटने करण्यात आली.

मसदे गुरामवाड कट्टा रस्ता ते वामन पाटकर घर जाणारा रस्ता ५ लाख, मसदे गुरमवाड कट्टा रस्ता ते वडाचापाट बौध्दवाडी मार्गे लीला काप रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख, नेरुरकर फॅक्टरी येथे कॉजवे बांधणे २५ लाख, जलजीवन मिशन अंतर्गत पाटकरवाडी, थळकरवाडी, कुळकरवाडी, नौपाटवाडी, ब्राम्हणवाडी येथे नळपाणी योजना निधी ७० लाख या कामांची भूमिपूजने करण्यात आली.

यावेळी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर,कुडाळ मालवण विधानसभा संपर्क प्रमुख संग्राम प्रभुगावकर, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, उपतालुका प्रमुख बाळ महाभोज, उपतालुका प्रमुख पराग नार्वेकर, महिला तालुका प्रमुख श्वेता सावंत, विभागप्रमुख कमलाकर गावडे, विभाग प्रमुख विजय पालव, भाऊ चव्हाण, सन्मेष परब,पंकज वर्दम,अशोक नांदोसकर, हेमंत माळकर, भिकाजी गावडे, राजू गावडे,बबन गावडे, अरुण गावडे,नाना पालव, सुशील पालव, छोटू पालव,गिरीष पालव, विठ्ठल नाईक, राजा पालव,नाना नेरुरकर,कृष्णा पाटकर,सुरेश नेरुरकर,वामन पाटकर, दिलीप पालव, हर्षद मोरजकर,प्रसाद रेवडेकर,देवदास रेवडेकर,यशवंत भोजने, आकेरकर सर, दर्शन म्हाडगूत, वंदेश ढोलम आदींसह त्या त्या गावातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 88
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 442

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स