मालवणात उद्या ३० डिसेंबरला विकसित भारत संकल्प यात्रा ; विविध योजना व कार्ड अद्यावत करण्यासाठी नागरीकांनी लाभ घ्यायचे नगरपरिषद प्रशासनाचे आवाहन.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरात भरड नाका येथील बाणावलीकर कंपांऊंड येथे उद्या ३० डिसेंबरला सकाळी ९ ते दुपारी १२ पर्यंत विकसित भारत संकल्प यात्रा उपक्रम संपन्न होत आहे. या उपक्रमा अंतर्गत, आधार कार्ड अद्ययावत करणे आयुष्यमान कार्ड शिबिर, पंतप्रधान स्वनिधी योजना, प्रधानमंत्री उज्वला , आरोग्य शिबिर इ. योजनांची नागरीकांना माहिती / लाभ मिळणार आहे.
या भारत संकल्प यात्रेचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मालवण नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)