ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
रजतची 'ब्राॅन्झ' कामगिरी ; टोपीवाला हायस्कूलचा माजी विद्यार्थी रजत रविकिरण तोरसकरने टेबल टेनिसच्या विद्यापिठीय राष्ट्रीय विभागीय स्पर्धेत पटकावले कांस्य पदक.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

रजतची 'ब्राॅन्झ' कामगिरी ; टोपीवाला हायस्कूलचा माजी विद्यार्थी रजत रविकिरण तोरसकरने टेबल टेनिसच्या विद्यापिठीय राष्ट्रीय विभागीय स्पर्धेत पटकावले कांस्य पदक.

प्रकाशन: 29 Dec 2023 06:54 AM
वाचन संख्या 102

मालवण | सुयोग पंडित : जिल्ह्यातील मालवण शहरातल्या टोपीवाला हायस्कूलचा माजी विद्यार्थी रजत रविकिरण तोरसकर याने टेबल टेनिस मध्ये राष्ट्रीय विभागीय स्पर्धेत ब्राॅन्झ पदक पटकावले. या स्पर्धा भोपाळ येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये भारताच्या पश्चिम विभागातील महाराष्ट्र, गुजराथ, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यातील विद्यापीठ यांचा समावेश होता. पश्चिम विभागातील ७२ विद्यापीठांचा यात समावेश होता.

रजत तोरसकर व त्याच्या संघाने याने सदरच्या स्पर्धेमध्ये नागपूर विभागातील संत तुकडोजी महाराज विद्यापीठचे प्रतिनिधित्व केले. अतिशय चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत नागपूर संघाने अतिशय उत्कृष्ट खेळ करत अंतिम चार संघ यामध्ये स्थान मिळवले. कुमार रजत याने प्राथमिक फेरीतील सर्व सामने जिंकले आणि आपल्या संघालाअंतिम चार मध्ये स्थान मिळवून दिले. अंतिम चार संघा मध्ये झालेल्या राऊंड रॉबिन फेरी चुरशीची झुंज देऊन कास्य पदक मिळवले.यामुळे त्यांची निवड राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या विद्यापीठीय स्पर्धे साठी झाली आहे. तसेच खेलो इंडिया स्पर्धा खेळण्याची संधी मिळणार आहे.

रजत हा मालवण येथील टोपीवाला हायस्कूल आणि स. का पाटील महाविद्यालय याचा माजी विद्यार्थी आहे तसेच शिक्षिका सौ. ज्योती बुवा तोरसकर यांचा सुपुत्र आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे मालवण येथील कोरगांवकर टेबल टेनिस अकादमी चे संस्थापक आणि त्याचे मार्गदर्शक श्री.विष्णू कोरगावकर तसेच त्याचे प्रशिक्षक डॉ. राहुल पंत वालावलकर, टेबल टेनिस संघटनेचे श्री. हेमंत वालकर आनि इतर सदस्यांनी अभिनंदन केले आहे. रजत तोरसकर च्या यशामुळे जिल्ह्यातील खेळाडू याना प्रोत्साहन मिळणार आहे आणि टेबल टेनिस खेळाचा जिल्ह्यात प्रचार प्रसार होईल असे मत व्यक्त केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स