ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
कणवलीतील नेत्रालयात शस्त्रक्रिया केल्यानंतर रुग्णाची नजर गेल्याची धक्कादायक घटना ; आ. वैभव नाईक यांनी नेत्रालयावर धडक देत जाब विचारून झाल्यावर नेत्रालयाने केले 'शटर डाऊन.'

कणवलीतील नेत्रालयात शस्त्रक्रिया केल्यानंतर रुग्णाची नजर गेल्याची धक्कादायक घटना ; आ. वैभव नाईक यांनी नेत्रालयावर धडक देत जाब विचारून झाल्यावर नेत्रालयाने केले 'शटर डाऊन.'

प्रकाशन: 29 Dec 2023 02:21 PM
वाचन संख्या 997

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या सुकळवाड येथील शंकर टेबुलकर या नेत्र रुग्णाच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया केल्यानंतर त्या रुग्णाची नजरच गेल्याची धक्कादायक घटना घडली.

ही बाब निदर्शनास आल्यानंतर कणकवलीत त्या नेत्रालयाच्या कार्यालयात आमदार वैभव नाईक यांनी या रुग्णाच्या नातेवाईकांसह धडक देत नेत्रालय प्रशासन व्यवस्थापनाच्या पूनम जगदाळे यांना जाब विचारला. या रुग्णाचे ऑपरेशन केलेल्या डॉक्टरांसह प्रमुख जबाबदार अधिकाऱ्यानी उद्या या रुग्णाच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांना नुकसान भरपाई द्या. तसेच या प्रकरणी या संबंधित दोशींवर कारवाई करा या मागणीसाठी शल्य चिकित्सकांकडे तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली. यावेळी आमदार वैभव नाईक यांच्यासह युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, युवा सेना उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, आमडोस्कर आदि उपस्थित होते.

यावेळी नेत्रालय प्रशासनावर अक्षरशः प्रश्नांचा भडिमार करत जिल्हा रुग्णालयात ३ हजारात होणारी शस्त्रक्रियेला २७ हजार कसे लागतात? असा सवाल देखील उपस्थित करण्यात आला. दरम्यान आमदार वैभव नाईक यांनी या नेत्रालयावर धडक दिल्यानंतर नेत्रालयाचे शटर बंद करण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स