नारिंग्रे येथे उद्या दत्तजयंती उत्सव.
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या दत्त प्रासादिक मंडळ पूर्व विभाग जोगवलवाडी, नारींग्रे यांच्यावतीने उद्या २६ डिसेंबर रोजी दत्तजयंती उत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
सकाळी ८:०० वा. अभिषेक, सद्गुरू, नामाचे हवन, महापूजा,
दुपारी १२:३० वा. ते २:३० वा. महाप्रसाद, सायं. ४:३० ते ६:३० वा. किर्तन व दत्तजन्म किर्तनकार ह.भ.प. अमित धाकोजी सावंत (मुणगे सावंतवाडी), सायं. ६:३० ते ८:०० वा. दत्त पालखी सोहळा,
रात्री ९:०० ते १०:०० वा. ग्रामस्थांची भजने, रात्री १०:०० वा. श्री रोहित गोंधळी प्रस्तुत श्री देव घोडेश्र्वर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ” हर्षदा सत्व परीक्षा ” होणार आहे. उपस्थिती चे आवाहन श्री दत्त प्रासादिक मंडळ, नारींग्रे / श्री दत्त जयंती उत्सव मंडळ, नारिंग्रे यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)