ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
मालवण भाजी मार्केट, फायर स्टेशन, नाट्यगृह हॉल दुरुस्तीची कामे मार्चपर्यंत पूर्ण करा ; आ. वैभव नाईक यांनी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांना दिल्या सूचना.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मालवण भाजी मार्केट, फायर स्टेशन, नाट्यगृह हॉल दुरुस्तीची कामे मार्चपर्यंत पूर्ण करा ; आ. वैभव नाईक यांनी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांना दिल्या सूचना.

प्रकाशन: 25 Dec 2023 03:41 PM
वाचन संख्या 251

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा नियोजन मधून मालवण नगरपरिषदेच्या भाजी मार्केटसाठी २ कोटी , फायर स्टेशनसाठी २ कोटी व मामा वरेरकर नाट्यगृहाच्या हॉलच्या दुरुस्तीसाठी १ कोटी रु निधी गेल्या ३ वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आला आहे. मात्र ही कामे धीम्या गतीने सुरु असून, पूर्ण करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे आ. वैभव नाईक यांनी रविवारी या तिनही कामांच्या ठिकाणी भेट देऊन कामाची पाहणी करत मार्च महिन्यापर्यंत तीनही कामे पूर्ण करण्याच्या सक्त सूचना मुख्याधिकारी व प्रशासक संतोष जिरगे यांना दिल्या आहेत. अन्यथा नगरविकास विभागाच्या सचिवांकडे याबाबत तक्रार करण्यात येणार असल्याचे आ. वैभव नाईक यांनी सांगितले.

यावेळी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी,माजी बांधकाम सभापती यतीन खोत, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर,शहर प्रमुख बाबी जोगी, महेश जावकर, महिला तालुका प्रमुख दिपा शिंदे, तपस्वी मयेकर, भाई कासवकर,सिद्धेश मांजरेकर, मांजरेकर आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स