बिळवस दत्त मंदिर उद्या येथे २६ डिसेंबरला दत्त जयंती सोहळा.
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या बिळवस दत्त मंदिर येथे उद्या २६ डिसेंबरला दत्त जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता मूर्तीला अभिषेक,पूजन, सायंकाळी ४ वाजता सत्यनारायण महापूजा, रात्री ८ वाजता सुस्वर भजन, रात्री ९ वाजता हभप हृदयनाथ गावडे यांचे कीर्तन, रात्री ११.३० वा. दत्तजन्म, रात्री १२ वाजता पालखी सोहळा आदि कार्यक्रम होणार आहेत. उपस्थिती चे आवाहन करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)