श्रेयस तळपदे यांना ह्रदयविकाराचा झटका..!
मुंबई | ब्यूरो न्यूज : हिंदी व मराठी सिनेमा सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते श्रेयस तळपदे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली असून श्रेयस यांना मुंबईतील अंधेरीच्या बेलेव्ह्यू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हृदयविकाराच्या झटक्यानंतर श्रेयस तळपदे यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली असल्याची रुग्णालयाकडून प्राथमीक माहिती देण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते आहे. ४७ व्या वर्षी श्रेयस तळपदे यांना हृदयविकारचा झटका आला.
श्रेयस तळपदे गुरुवारी १४ डिसेंबरला ‘वेलकम टू द जंगल’ या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण करत होते आणि चित्रीकरण संपल्यानंतर ते घरी पोहोचले तेंव्हा त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. सध्या अँजिओप्लास्टीनंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. मात्र श्रेयस यांच्या प्रकृतीबद्दल रुग्णालयाने सध्या कोणतेही अधिकृत वैद्यकीय बुलेटिन जारी केलेले नाही.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)