ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
महामार्गावरील भीषण  अपघातात महिलेचा मृत्यू.!

महामार्गावरील भीषण अपघातात महिलेचा मृत्यू.!

प्रकाशन: 14 Dec 2023 10:08 PM
वाचन संख्या 538

कणकवली | ब्यूरो न्यूज : मुंबई-गोवा महामार्गावर जानवली-रतांबीव्हाळ जवळ आज संध्याकाळी कार व दुचाकीमध्ये अपघात झाला. हा अपघात एवढा भयानक होता की दुचाकीवरील महिला ही ५० फुटपेक्षा जास्त फरफटत गेली. या अपघातात धडक देणारा कार चालक त्याच स्थितीत खारेपाटण च्या दिशेने कारसह पळून गेला. अपघातानंतर जखमी महिला अंजली अमित साळवी (३७ वर्षे) रा.शिवाजीनगर कणकवली यांना एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवण असे डॉक्टरांनी स्पष्ट केले . संध्याकाळी ५ ; ४० च्या दरम्यान ही दुर्घटना घडली.

अंजली अमित साळवी ह्या जानवली येथे दुचाकीवरून जात असताना एका दुभाजकाच्या बाजुच्या फाट्यावरून वळत असताना त्यांना कणकवलीहून राजापूरच्या दिशेने जाणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की दुचाकीचा चेंदामेंदा झाला. दुचाकी चालक अंजली साळवी यांच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. त्यांना त्वरीत खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तिला तपासून त्या मृत झाल्याचे सांगितले.

याबाबत अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी कणकवली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज पाटील, पोलिस नाईक रूपेश गुरव, पो.कॉ. स्वप्निल जाधव, महिला पोलिस सुप्रिया भागवत, भुषण सुतार आदी घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत. अपघातात मृत झालेल्या अंजली अमित साळवी ह्यांच्या पश्चात पती, दोन मुलं, सासू असे कुटुंब आहे.

फोटो सौजन्य | कणकवली ब्यूरो

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स