आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते जेष्ठ नागरिकांचा सत्कार ; बेसा गांवातील श्री राधाकृष्ण मंदिर समितीचे आयोजन.
वैभव नाईक होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे.
कणकवली | प्रतिनिधी : नागपूर येथे बेसा गावातील ‘जयंती नगर ५’ येथील श्री राधाकृष्ण मंदिर समितीच्या वतीने जेष्ठ नागरिक गुणगौरव सत्कार सोहळा १३ डिसेंबरला बुधवारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कुडाळ – मालवणचे वैभव नाईक यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी वैभव नाईक व अन्य मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. जेष्ठ नागरिकांना शाल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन वैभव नाईक यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रकाश आबिटकर, महेश चौगुले, विकास कुंभारे, जयंत आसगांवकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)