हापूस आंबा बागायदारांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाचे पाऊल..!
मुंबई | ब्यूरो न्यूज : गेली काही वर्षे कोकणातील आंबा बागायदारांसाठी आंबा फळा पिकाचे उत्पन्न अनियमित आहे. विविध नैसर्गिक आपत्तींसोबतच त्या अनुषंगाने निर्माण होणारे रोग यामुळे आंबा बागायदार चिंतेत असतात. वादळी वारे, गारपीट, हापूस आंबा बागांमध्ये होणारा तुडतुडे, मिजमाशी, फुलकिडींचा प्रादुर्भाव वेळेतच रोखता यावा याकरिता रत्नागिरी, सिंधुदुर्गातील हापूस आंबा पिकासाठी कृतिदल (टास्क फोर्स) स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)