ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
खंडणीखोर आणि हफ्ते वसुली करणाऱ्यांच्या तोंडी भ्रष्टाचाराची भाषा शोभत नाही...!

खंडणीखोर आणि हफ्ते वसुली करणाऱ्यांच्या तोंडी भ्रष्टाचाराची भाषा शोभत नाही...!

प्रकाशन: 13 Oct 2021 04:39 PM
वाचन संख्या 42

पं. स. उपसभापती प्रकाश पारकर यांचा टोला

कणकवली | उमेश परब : पं. स. कणकवली चे नवीन इमारतीचे काम हे आता पर्यंत पूर्णपणे योग्य रितीने व यशस्वी रित्यापूर्ण झालेले आहे. यामध्ये कोणताही भ्रष्टाचार किंवा चुकीचे काम झालेले नाही. सदरचे काम व्यवस्थितपणे पूर्ण करून लवकरात लवकर पं. स. कणकवलीची अद्ययावत प्रशासकीय इमारत लोकांच्या सेवेत रुजू व्हावी, लोकांना एकाच ठिकाणी सर्व विभागांची कामे कमी वेळेत करता यावी, जनतेला कोणताही त्रास होऊ नये, या हेतूनेच सदरची कामे लवकरात लवकर पूर्ण केलेली आहेत. केवळ उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या इमारतीमध्ये अपशकुनी बोके चांगल्या कामामध्ये आडवे येण्याचा प्रयत्न करत आहेत. तरी त्यांनी प्रत्यक्ष कामासंदर्भातील माहिती घ्यावी. कणकवली पंचायत समितीने गेली कित्येक वर्षे रोबविलेले उपक्रम व केलेल्या विकास कामाची कणकवलीच नवे तर पूर्ण महाराष्ट्राने दखल घेतली. तेव्हा आपण कुठे झोप काढत होता, याचा खुलासा करावा. यांच्या अनेक वर्षांच्या कालावधीमध्ये टक्केवारीचे राजकारण करून पोट भरणाऱ्या अशा निष्क्रिय शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना चांगले काम करणाऱ्या लोक प्रतिनिधीची स्तुती करता येत नसेल तर किमान चांगल्या कामात मांजर आडवी त्याप्रमाणे गालबोट लावण्याचे काम करू नये, असा टोला पं. स. उपसभापती प्रकाश पारकर यांनी लगावला आहे.

सन २०१४ साली न. पं. कणकवलीमध्ये कन्हैया पारकर उपनगराध्यक्ष असताना पाण्याच्या नळाचे ९०० रुपयाचे मीटर २१४३ रुपयाला खरेदी करून कणकवली न. पं. मध्ये भ्रष्टाचाराचा कळस गाठला होता, हे सर्वांना ज्ञात आहे. म्हणूनच तेव्हा त्यांना पक्षाने तिकीट दिले नव्हते. कन्हैया पारकर यांच्या अश्याच वृत्तीमुळे त्यांचे भाऊ संदेश पारकर यांना घरी बसावे लागले. आता हेच काम कन्हैया पारकर शिवसेनेच्या शाखेत बसून वैभव नाईक यांना घरी बसवण्याचा प्रयत्न करत नाही ना असे वाटते. कन्हैया पारकर हे मागच्या दाराने कणकवली न. पं. मध्ये नगरसेवक आहेत. ते देखील भाजप मुळेच आहेत, हे त्यांनी विसरू नये.

शैलेश भोगले यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. अशा खंडणीखोर शैलेश भोगले यांनी सभापती यांच्याबद्दल बोलताना भान ठेवून व विचार करून बोलावे. स्वतःची गेलेली वकिली (सनद) ही हर्षद गावडे यांनी घालवून आता शिवसेनेत टक्केवारीचा नवीन व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे त्यांना कोणतेच चांगले काम दिसत नाही. पं. स. कणकवलीचे पदाधिकारी आपला प्रशासकीय कारभार अत्यंत स्वच्छ व निस्वार्थपणाने करत आहेत. याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांच्या कार्यकत्यांना बरेच वेळा आलेला आहे. त्यामुळे कणकवली पं. स. तिचा कारभार सुरळीत पाडण्यासाठी सभापती व सदस्य सक्षम आहेत, असे उपसभापती प्रकाश पारकर यांनी म्हटले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स