ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
आंतरराष्ट्रीय पंच अशोक दाभोलकर यांच्या गुणगौरवाचे होतेय सार्वत्रिक अभिनंदन..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

आंतरराष्ट्रीय पंच अशोक दाभोलकर यांच्या गुणगौरवाचे होतेय सार्वत्रिक अभिनंदन..!

प्रकाशन: 13 Oct 2021 02:04 PM
वाचन संख्या 81

जिल्ह्यातील क्रिडा संस्कृतीसाठी एक आनंददायी प्रोत्साहन….

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : कालच आपली सिंधुनगरी चॅनेलच्या क्रिडा विभागाने दिलेल्या ,जिल्ह्यासाठीच्या गौरवास्पद अशा एका बातमीसारखीच त्याच बातमीची आणखीन एक बातमी समोर येत आहे. 
क्रीडा, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या सेवेबद्दल  मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी (रजि.) मुंबई ह्या प्रतिथयश संस्थेच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय गुणिजन गौरव पुरस्कार २०२०, वेंगुर्ला दाभोली येथील आंतरराष्ट्रीय शूटिंग बॉल पंच अशोक दाभोलकर याना प्रदान करण्यात आला आहे.
सिंधुदुर्गाचे लाडके व्यक्तीमत्व व आजही क्रीडा संस्कृती तळागाळात रुजावी म्हणून आपली लेखणी, कार्याने  सिंधुदुर्गाचे नांव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारे क्रीडा महर्षी श्री. अशोक गणेश दाभोलकर-मेस्री यांचा सदर पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.
गेल्या अर्धशतकात एक सर्वसामान्य खेळाडू ते आंतरराष्ट्रीय पंच हा देशभर अवघड प्रवास करताना आपला अनुभव व क्रीडा विषय व नियमांचे बारकावे
आज फेसबुक माध्यमाव्दारे आपल्या  लिखाणातून ते क्रीडा प्रेमींना उपलब्ध करून देत आहेत. अशोक दाभोलकरांच्या निवडी बद्दल वेंगुर्ले नगराध्यक्ष राजन गिरप,माजी जि प अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, वेंगुर्ला नगराध्यक्ष राजन गिरप, उद्योजक डॉ दीपक परब, मुंबई शूटिंग बॉल असो. सचिव दीपक सावंत,
राजेंद्र सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा शुटिंगबॉल अध्यक्ष संजय कदम, भाजप मालवण महिला अध्यक्ष सौ लक्ष्मी पेडणेकर,पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर यांनी अभिनंदन केले आहे.
अशाप्रकारे विविध क्षेत्रांतून व विविध तालुक्यातून श्री.अशोक दाभोळकर यांचे होणारे अभिनंदन हे संपूर्ण क्रिडाक्षेत्राला आनंददायी असेच आहे.
श्री अशोक दाभोळकर यांचा क्रिडा क्षेत्रातून सामाजिक कार्य ,तंदुरुस्ती व खेळाडुंची कारकिर्द शालेय वयातूनच घडवायला लागायच्या उद्देशाने आता जिल्ह्यात क्रिडा संस्कृती अतिशय व्यावसायिक व व्यापकपणे जोपासली जाईल अशी श्री.अशोक दाभोळकर यांनीही आशा व्यक्त करुन आपली सिंधुनगरी चॅनेल व सर्व मान्यवरांचे आभार मानले आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स