आचरा गाऊडवाडी येथे उद्यापासून 'श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा' होणार संपन्न.
आचरा | अनिकेत पांगे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आचरा येथे सालाबाद प्रमाणे या वर्षी उद्या शनिवार दिनांक ९ डिसेंबर ते सोमवारी ११ डिसेंबर पर्यंत श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा, गाऊडवाडी येथे संपन्न होणार आहे. या सोहळ्या निमित्त खालील प्रमाणे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
शनिवार दिनांक ९ डिसेंबरला
सकाळी १० – श्री ज्ञानेश्वर महाराज तस्वीर प्रतिष्ठापना, पुजा आरती.
दुपारी १२ वा. आणि संध्याकाळी
७ वा. हरिपाठ.
संध्याकाळी ४ ते ५:५० प.पु.श्री कलावती आईंचे भजन व नामस्मरण.
रात्रौ ठीक ९;३० वा. ह.भ.प. कु. मृणाल गावकर रा. शिरवंडे यांचे सुश्राव्य कीर्तन.
रविवारी दिनांक- १० डिसेंबरला
सकाळी १० वा. पुजा,आरती.
दुपारी १२ वा. हरिपाठ
दुपारी १२;३० ते २;३० महाप्रसाद
संध्याकाळी ५ते ७पर्यंत ज्येष्ठ नागरिक यांची
स्वर – यात्रा.
रात्रौ १० वा. भजन.
सोमवार दिनांक१ ११ डिसेंबरला
सकाळी १०वा. पुजा,आरती.
दुपारी १२ वा. हरिपाठ.
रात्रौ ठीक १० वा. वारकरी दिंडी आणि दिंडी नंतर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता होईल. तरी सर्व भाविक भक्तांनी श्री सोहळ्याचा लाभ घ्यायचे आवाहन करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)