राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्यवतीने महापरिनिर्वाण दिनाच्यानिमित्ताने महामानवाला मानवंदना
कुडाळ /प्रतिनिधी: कुडाळ, दि. ०६ डिसेंबर रोजी कुडाळ शहरातील आंबेडकरनगर येथील महामानव डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला, महापरिनिर्वाण दिनाच्यानिमित्ताने माजी आमदार सुभाष चव्हाण, कुडाळ शहराच्या नगराध्यक्षा सौ. अक्षता खटावकर, माजी नगराध्यक्षा सौ. आफरिन अब्बास करोल, आणि सामाजिक कार्यकर्ते प्रकाश जैतापकर यांच्या हस्ते पुष्पहार मनोभावे अर्पण करून मान वंदना देण्यात आली. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते आणि माऊली मित्रमंडळ, व्यापारी मित्र मंडळ, राजेंद्र मनोहर पेडणेकर मित्रमंडळाचे संस्थापक राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी उपस्थित राहून, पुष्पांजली अर्पण करून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन केले. यावेळी माजी आमदार सुभाष चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. नगराध्यक्षा सौ. अक्षता खटावकर आणि माजी उपनगराध्यक्षा सौ. करोल यांनी मनोगत व्यक्त करुन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पांजली अर्पण करून वंदना दिली,.
याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष विजय प्रभु, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष तरबेज शेख, रोहन काणेकर यांच्यासहित कुडाळ शहरातील बहुसंख्य नागरिक आणि पेडणेकर यांच्या मित्र मंडळाचे सदस्य उपस्थित होते. सर्वानी पुष्पांजली अर्पण करून मान वंदना दिली.माजी आमदार सुभाष चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश जैतापकर, नगराध्यक्षा अक्षता खटावकर, माजी आफरिन अब्बास करोल, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या, प्रमुख उपस्थितीत विजय प्रभु ( जिल्हा उपाध्यक्ष,) तबरेज शेख ( अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष) रोहन काणेकर आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)