ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
अक्कलकोट मध्ये थ्रोबॉल व सॉफ्टफुटबॉल राज्य स्पर्धेचे थाटात उदघाटन

अक्कलकोट मध्ये थ्रोबॉल व सॉफ्टफुटबॉल राज्य स्पर्धेचे थाटात उदघाटन

प्रकाशन: 06 Dec 2023 03:09 PM
वाचन संख्या 34

मसुरे | प्रतिनिधी :श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट ,थ्रोबॉल असोसिएशन सोलापूर, सोलापूर शहर व जिल्हा सॉफ्ट फुटबॉल असोसिएशन व महेशजी इंगळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून व महाराष्ट्र थ्रोबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने 29 वि सब ज्युनिअर व 33 वी सीनियर राज्यस्तरीय थ्रोबॉल राज्य अजिंक्यपद स्पर्धा व चौथी सब ज्युनिअर ,ज्युनिअर सीनियर राज्यस्तरीय सॉफ्टफुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा मुले व मुली आणि पुरुष व महिला स्पर्धेचे उद्घाटन सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांच्या शुभहस्ते आणि श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष श्री महेशजी इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली व सॉफ्टफुटबॉलचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. नगरसेवक सीए विनोद भोसले व प्रथमेश इंगळे महाराष्ट्र थ्रोबॉल संघटनेचे सचिव सुनीलजी इंगोले ,सॉफ्टफुटबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे राज्याध्यक्ष राजेंद्र माने यांच्या प्रमुख उपस्थितीत अक्कलकोट येथे संपन्न झाला या कार्यक्रमासाठी कारागीर पेट्रोल पंपचे मालकसचिन किरणळी ,सॉफ्टफुटबॉल चे राज्य सहसचिव संदीप लंबे, थ्रोबॉल चे राज्य सहसचिव सुरेश हाधीमणी, राज्य संचालक राजेंद्र मागाडे ,जळगाव चे सचिव अशोक निकम सर, रायगडचे सचिव विलास मोरे ,धाराशिव चे बालाजी पवार ,नाशिकचे विलास निर्भवणे, सचिन तिकटे, शाहू सलगर हे उपस्थित होते

या स्पर्धेसाठी पंच म्हणून विठ्ठल सरवदे संतोष पाटील सोलापूर ,शुभम झेंडे कोल्हापूर ,सुरेश हादीमणी कोल्हापूर, विलास निर्भवणे नाशिक हे काम पाहत आहेतया स्पर्धेचे आयोजन नियोजनासाठी सॉफ्टफुटबॉल खेळाचे जनक थ्रोबॉलचे जिल्हाध्यक्ष प्रा.संतोष खेंडे, सचिव मारुती घोडके ,संचालक राजाराम शितोळे, तांत्रिक प्रमुख दत्तात्रय पाटील ,विठ्ठल सरवदे ,संतोष पाटील, अमोल कोकाटे ,गंगाराम घोडके प्राची बऱ्हाणपुरे ,श्रीधर गायकवाड ,प्रबुद्ध चिंचोलीकर ,प्रशांत कदम ,अविनाश राठोड, सतीश कुमार परदेशी हे परिश्रम घेत आहेत.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स