ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
माध्यमिक विद्यामंदिर साळशी प्रशालेत  उद्देश मोरे यांचा सेवानिवृत्तीपर शुभेच्छा व सन्मान समारंभ

माध्यमिक विद्यामंदिर साळशी प्रशालेत उद्देश मोरे यांचा सेवानिवृत्तीपर शुभेच्छा व सन्मान समारंभ

प्रकाशन: 03 Dec 2023 10:50 PM
वाचन संख्या 322

संतोषसाळसकर | सहसंपादक: देवगड तालुक्यातील साळशी येथील माध्यमिक विद्यामंदिर प्रशालेचे शिक्षकेतर कर्मचारी प्रशाला परिचर उद्देश सि. मोरे यांचा नियत वयोमानानुसार ३२ वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्ती पर शुभेच्छा, सत्कार व सन्मान सोहळा ३० नोव्हेंबर रोजी अतिशय भावूक वातावरणात संपन्न झाला.

या समारंभाचे अध्यक्ष प्रभाकर साळसकर (उपाध्यक्ष – संस्था) यांनी स्विकारले.यावेळी सत्कार मूर्ती – सौ.व श्री.उद्देश सि.मोरे, प्रमुख पाहुणे व अतिथी म्हणून -सत्यवान सावंत (चेअरमन – स्कूल कमिटी), सुनिल गांवकर (सल्लागार – संस्था), संस्था सदस्य -विजय सुतार,मंगेश साळसकर, संतोष साळसकर ,मुख्याध्यापक माणिक वंजारे, सौ.कोदले (केंद्रशाळा स.शिक्षिका), नाईक,प्रशालेचे सर्व विद्यार्थ्यी ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, उद्देश मोरे यांचे कुटुंबीय व हितचिंतक या सोहळ्यास उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीपूजन व दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.ईशस्तवन व स्वागतगीताने तसेच मुख्या. माणिक वंजारे यांनी गुलाबपुष्प देऊन सर्व उपस्थितांचे स्वागत केले.

मुख्या‌ध्यापक माणिक वंजारे यांनी आपल्या प्रास्ताविकेतून मोरे यांच्या ३२ वर्षाच्या सेवेतील कामकाजाचा संक्षिप्त आढावा घेतला. प्रशालेच्या अनेक विद्यार्थ्यांनी व शिक्षक संजय मराठे, पुरुषोत्तम साटम , स्वप्नील भरणकर सरांनी मोरे यांच्या विषयीच्या आपल्या स्मृती मनोगतातून जागृत केल्या.

संस्था सदस्य – विजय सुतार, मंगेश साळसकर, सुनिल गांवकर यांनी ही मोरे यांच्या ३२ वर्षाच्या कारकिर्दीला उजाळा देणाऱ्या आठवणी व शुभेच्छा आपल्या विचारातून व्यक्त केल्या.मुख्याध्यापक माणिक वंजारे यांनी मोरेच्यां ३२ वर्षाच्या कार्याचा संक्षिप्त आढावा,त्या़ंचे व्यक्तिमत्त्व तसेच आठवणी यांचा उहापोह आपल्या भावुक मनोगतातून करताना पुढील वाटचालीसाठी कवितारुपी शुभेच्छा दिल्या.

सत्यवान सावंत ( चेअरमन – स्कूल कमिटी) यांनी ही मोरे यांच्या कार्याचा गौरव करणारे व शुभेच्छा देणारे विचार प्रकट केले.याऩंतर सत्कारमूर्ती – उद्देश मोरे यांचा सत्कार शाल, श्रीफळ व सफारी कापड पिस देऊन कार्य.अध्यक्ष- प्रभाकर साळसकर यांच्या हस्ते करण्यात आला.व मोरे यांच्या पत्नीचा सत्कार सौ.कोदले मॅडम यांच्या हस्ते साडी व ओटी देऊन करण्यात आला.

सत्कारमूर्ती – मोरे आपले मनोगत व्यक्त करताना -शाळा, संस्था, शिक्षक, विद्यार्थी यांच्या विषयी आपल्या भावना व आठवणी व्यक्त करताना ते भावुक झाले.अध्यक्षीय भाषणात प्रभाकर साळसकर यांनी मोरे यांचे कार्य व स्मृति विषयी आठवणी जागृत केल्या.

शेवटी आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.या स़़ंपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नील भरणकर यांनी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स