ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
माजी खासदार निलेश राणे यांचे दातृत्व.

माजी खासदार निलेश राणे यांचे दातृत्व.

प्रकाशन: 04 Dec 2023 05:27 PM
वाचन संख्या 190

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस येथे काही दिवसापूर्वी झालेल्या मोटरसायकलच्या अपघातात उपचारादरम्यान मयत झालेल्या मालवण तालुक्यातील वेरळ गावातील दिनेश वेरलकर या ग्रामस्थांच्या राहत्या घरी जाऊन माजी खासदार निलेश राणे यांनी या कुटुंबाची भेट घेऊन या कुटुंबाला धीर दिला. तसेच या कुटुंबाला तातडीने रोख रुपयांची मदत देऊन दिनेश वेरलकर यांच्या आजारी मुलाच्या पुढील उपचारासाठी सर्व ते प्रयत्न करण्याचे यावेळी बोलताना माजी खासदार निलेश राणे यांनी सांगितले.

ज्या ज्या वेळी एखाद्या कुटुंबावरती प्रसंग ओढवतो तेव्हा माजी खासदार निलेश राणे हे धावून जातात. यावेळी सुद्धा निलेश राणे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत मृत पावलेल्या दिनेश वेरलकर या कुटुंबाला खऱ्या अर्थाने मानसिक आधार देऊन रोख रकमेची मदतही केली. यावेळी त्यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाचे जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, भाजप मालवण तालुका अध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी जी प अध्यक्ष सरोज परब, महेश बागवे, वेरळ सरपंच धनंजय परब, माजी उपसभापती छोटू ठाकूर, संतोष पालव, पुरुषोत्तम शिंगरे, अनंत भोगले, बाळा मेस्त्री, महेश मांजरेकर, जितेंद्र परब, यशवंत हिंदळेकर, कैतान लोबो,शिवाजी परब, जगदीश चव्हाण, श्री सावंत, लवू वेतलकर, सदाशिव परब, श्री मुणगेकर, दत्ताराम परब, चेतन वेलकर, रघुनाथ परब, नामदेव परब, कालिदास वेरलकर, किरण पाटील, योगेश बागवे, भागेश परब,अनिल परब आणि वेरली ग्रामस्थ तसेच भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. माजी खासदार निलेश राणे यांचे वेरलकर परिवाराने ऋण व्यक्त केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स