ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
संविधान बचाव यात्रा, मा. आनंदराज आंबेडकर यांचे कणकवली शहरात स्वागत
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

संविधान बचाव यात्रा, मा. आनंदराज आंबेडकर यांचे कणकवली शहरात स्वागत

प्रकाशन: 29 Nov 2023 07:00 PM
वाचन संख्या 50

कणकवली/ प्रतिनिधि: दि. २९ नोव्हेंबर,राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या माऊली मित्रमंडळ आणि नगरपंचायत व्यापारी मित्रमंडळ, कणकवली ( अप्पासाहेब पटवर्धन चौक ) चे सदस्य सुभाष उबाळे यांच्या नेतृत्वाखाली, मा. आनंदराज आंबेडकर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु ( सरसेनानी रिपब्लिक सेना ), मा. काकासाहेब खांबाळकर ( प्रदेशाध्यक्ष रिपब्लिकन सेना ), मा. विश्वनाथ कदम ( जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा ) यांना पुष्पगुच्छ देत कणकवली अप्पासाहेब पटवर्धन चौक येथे स्वागत करण्यात आले.संविधान बचाव ही यात्रा २४ ऑक्टोंबर २०२३ पासुन सुरु करण्यात आली आहे, हिच यात्रा ६ डिसेंबर २०२३ पर्यंत चालु राहणार आहे. या यात्रेची सुरुवात दिक्षाभुमी नागपुर पासुन झाली आहे; हिच पुढे जाऊन त्यांची चैत्यभुमी, दादर ( मुंबई ) पर्यंत जाणार आहे.राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी फोनव्दारे संविधान यात्रेत उपस्थित असलेल्या, मा. आनंदराव आंबेडकर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु ( सरसेनानी रिपब्लिक सेना ) संविधान बचाव, या महान कार्यास आमच्या सर्वच मंडळाचा संपुर्णपणे पाठिंबा आहे, असे म्हटले.यावेळी अविनाश गावडे, भगवान कासले, प्रसाद घाडीगांवकर, प्रसाद पाताडे, प्रभाकर कदम, ज्ञानदेव मोडक, जनीकुमार कांबळे, सुभाष जाधव, प्रकाश कांबळे, संदीप कदम, बाळकृष्ण जाधव, दिलीप तरंदळेकर, दत्ता पवार, तानाजी कांबळे, अनिल तांबे, गोपीकृष्ण पवार आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स