बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथे संविधान दिन साजरा
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर. बॅ नाथ पै सेवांगण कट्टा शाखेत संविधान दिन साजरा करण्यात आला.प्रारंभी मनोज काळसेकर यानी संविधान दिनाचे महत्व सांगितले. भारताचे संविधान लिखीत स्वरूपात असून जगातील सर्वात मोठे संविधान आहे. संविधानाचे हस्तलिखीत सुद्धा उपलब्ध आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे फार मोठे योगदान संविधान निर्मितीत आहे हेही त्यानी विषद केले.दीपक भोगटे यानी भारताच्या संविधानाने सर्वाना समान पातळीवर आणले असून एकतेचा संदेश संविधान देते. भारताची अखंडता टिकवण्यासाठी सर्वानीच संविधानाचा अभ्यास करणे आवश्यक आहे तसेच संविधान जागृतीसाठी कार्यरत राहाणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले.यावेळी सवांनी सामुदायिकरित्या संविधान प्रस्तावनेचे वाचन केले. विद्यार्थ्याना व पालकाना नरेंद्र दाभोलकर यांची अंधश्रद्धा निर्मूलना वरील पुस्तकेभेट देण्यात आलीया कार्यक्रमास किशोर शिरोडकर,चौके हायस्कूलच्या मुख्यापिका रसिका गोसावी, दीपक भोगटे, मनोज काळसेकर,अनुष्का चव्हाण, सुप्रिया आळवे, सुलक्षणा दळवी, निधी आळवे, गोपाळ परब,पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)