ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
शिवसैनिकांसह ग्रामस्थांनी देवगड निपाणी मार्ग रोखला
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

शिवसैनिकांसह ग्रामस्थांनी देवगड निपाणी मार्ग रोखला

प्रकाशन: 29 Nov 2023 07:20 PM
वाचन संख्या 114

– शिरगाव बाजारपेठेत प्रचंड वाहतूक कोंडी

– चौकेवाडी शाळेत शिक्षक देण्याची मागणी अधांतरी

संतोष साळसकर | सहसंपादक : देवगड तालुक्यातील शिरगाव चौकेवाडी प्राथमिक शाळेतील शिक्षकाच्या मागणीचा प्रश्न अद्याप अधांतरीच आहे. वारंवार आश्वासन देणाऱ्या शिक्षण विभागाला जाग आणण्यासाठी ग्रामस्थांनी आज देवगड निपाणी मार्ग रोखला. शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा देत या आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी शिक्षण मंत्री हाय हाय, या शिक्षणमंत्र्यांचे करायचे काय, खाली डोके वर पाय अशी घोषणाबाजी देत परिसर दणाणून सोडला. आठवडा बाजार असल्यामुळे दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. यामुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.शिरगाव चौकेवाडी शाळेत पहिली ते सातवी पर्यंत वर्ग आहेत. शाळेतील एक शिक्षक निवृत्त झाले. तर एका शिक्षकाला दुसऱ्या शाळेत कामगिरीवर पाठवले. सध्या शाळेत दोनच शिक्षक असून त्यातील एकाला शाळेचे कामकाज, सभा यासाठी नेहमी बाहेर जावे लागते. शाळेत सेमी इंग्लिश विषय असताना विद्यार्थ्यांना शिकवताना एकाच शिक्षकावर ताण येत असतो. यामुळे विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होत आहे. कामगिरीवर काढलेल्या शिक्षकाला पुन्हा शाळेत रुजू करावे या मागणीसाठी चौकेवाडी शाळा व्यवस्थापन समितीने काही महिन्यांपूर्वी शाळा बंद आंदोलन पुकारले. यावेळी पवित्र पोर्टल मार्फत भरती झालेल्या शिक्षकामधून या शाळेला प्राधान्याने शिक्षक दिला जाईल तसेच या शाळेतील कामगिरीवर काढलेला शिक्षकाची नेमणूक रद्द करून पुन्हा याच शाळेत त्यांना पाठविण्यात येईल असे आश्वासन गटशिक्षणाधिकारी श्रीरंग काळे यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते. ३१ ऑगस्ट रोजी धोपटेवाडी शाळेतील शिक्षकाची पर्यायी व्यवस्था म्हणून चौकेवाडी शाळेत नियुक्ती करण्याचे लेखी आदेश गटशिक्षणाधिकारी यांनी दिले होते. मात्र अद्याप कार्यवाही झाली नसल्याने ग्रामस्थांनी पुन्हा बुधवारी आंदोलनाचे हत्यार उपसले.यावेळी सरपंच समीर शिरगावकर, शिवसेना कणकवली विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, देवगड तालुकाप्रमुख मिलिंद साटम, उप तालुका प्रमुख रवींद्र जोगल, विक्रांत नाईक, यांच्यासह चौकेवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनस्थळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.अन्यथा मुले पंचायत समितीत बसवणारशिक्षकाच्या मागणी संदर्भात ५ डिसेंबर रोजी देवगड पंचायत समिती कार्यालयात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले असून यावेळी योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन गटशिक्षणाधिकारी यांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र चर्चेतून प्रश्न न सुटल्यास येथील दालनात विद्यार्थ्यांना बसवण्यात येईल आणि याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष चंद्रकांत राणे यांनी दिला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स