ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
शांत, संयमी स्वभावाने सामाजिक बांधिलकी जोपासत पोष्ट खात्यातून सेवानिवृत्त झालेले देवगड तालुक्यातील साळशी गावचे शाखा डाकपाल अनिल गावकर

शांत, संयमी स्वभावाने सामाजिक बांधिलकी जोपासत पोष्ट खात्यातून सेवानिवृत्त झालेले देवगड तालुक्यातील साळशी गावचे शाखा डाकपाल अनिल गावकर

प्रकाशन: 24 Nov 2023 04:14 PM
वाचन संख्या 43

४१ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर साळशी गावचे शाखा डाकपाल अनिल गावकर सेवानिवृत्त

२२ मार्च १९८२ ला वयाच्या २४ व्या वर्षी पोष्ट खात्यात रुजु

१२० रू. मानधनावर शाखा डाकपाल ( खातेबाह्य कर्मचारी ) म्हणून नोकरीला सुरुवात

शांत, संयमी स्वभावाने गाजवले सर्वांच्या मनावर राज्य

ग्राहक आणि ग्रामस्थांशी सलोख्याचे, जिव्हाळ्याचे संबंध

त्यांचा ज्येष्ठ सुपुत्र डॉ. योगेश ने केली कृषी क्षेत्रात पी.एच.डी. प्राप्त

संतोष साळसकर | सहसंपादक: आजच्या इंटरनेट युगात ग्रामीण भागात पोष्ट खात्याची विश्र्वासाहर्ता आजही दिसून येत आहे. अतिशय तुटपुंज्या पगारात पोष्ट खात्यात खाते बाह्य कर्मचारी म्हणून काम करत आपल्या कुटुंबाचा चरितार्थ सांभाळत गेली ४१ वर्षे अव्याहतपणे काम करणारे देवगड तालुक्यातील साळशी गावात शाखा डाकपाल अनिल गावकर हे गुरुवारी २३ नोव्हेंबर रोजी आपल्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांच्या गावकर कुटुंबीयांनी, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी सेवानिवृत्तीपर सत्कार समारंभ आयोजित केला होता.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. वैशाली सुतार या होत्या. यावेळी देवगडचे डाक निरीक्षक श्रीराम वायाळ, डाक आवेक्षक रविकांत लिंगायत, उपसरपंच कैलास गावकर, माजी पंचायत समिती सदस्य सुनील गावकर, माजी सरपंच अनिल पोकळे, वैभव साळसकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रभाकर साळसकर, आयनल पोष्ट मास्टर आनंद साटम, पोस्टमन सुनील घाडी, साळशी पोस्टमन संकेत कदम, कुवळे पोस्टमन सखाराम घाडी, गावकर यांचे ज्येष्ठ बंधू मानसिंग गावकर, कनिष्ठ बंधू तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक विजय गावकर, सौ विद्या गावकर, माजी उपसरपंच राजेंद्र साटम, अनंत नाईक, पोलीस पाटील सौ. कामिनी नाईक, चंद्रकांत नाईक, विक्रांत नाईक, विलास राणे, सत्यवान कांडर, सत्कारमूर्ती अनिल गावकर, सौ. अर्चना गावकर, सुपुत्र डॉ. योगेश गावकर, युगंधरा गावकर, अभिषेक गावकर, सौ. ऐश्वर्या गावकर, वेदांत गावकर, विजय सुतार, पोस्टमन रमाकांत गावकर आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी देवगड चे डाक निरीक्षक श्रीराम वायाळ यांच्या हस्ते अनिल गावकर आणि सुविद्य पत्नी सौ. अर्चना गावकर यांचा शाल, श्रीफळ देऊन यथोचित सत्कार केला. तसेच साळशी ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच सौ. वैशाली सुतार, उपसरपंच कैलास गावकर यांनी शाल, श्रीफळ, भेट वस्तू देऊन सत्कार केला. यावेळी लोकमान्य मल्टिपर्पज बँक, अमर ज्योत युवक क्रीडा मंडळ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, हितचिंतकांनी, मित्रमंडळी, नातेवाईकांनी देखील त्यांना शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन सत्कार करत पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अनिल गावकर यांनी वयाच्या २४ व्या वर्षी अवघ्या १२० रू. मानधनावर २२ मार्च १९८२ रोजी साळशी गावात शाखा डाकपाल म्हणून पोष्ट खात्यात नोकरीला सुरुवात केली. तुटपुंजे मानधन असूनही कौटुंबिक जबाबदारी आणि सामाजिक बांधिलकी सांभाळत वेळेचे बंधन न पाळता त्यांनी येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांशी, ग्रामस्थांशी सलोख्याचे, जिव्हाळ्याचे, विश्वासाचे नाते निर्माण केले. शिरगाव उपकार्यालयाशी कायमस्वरूपी समन्वय साधत आपल्या वरिष्ठांच्या आदेशाचे त्यांनी काटेकोरपणे पालन केले. याकामी त्यांना त्यांचे सहकारी कर्मचारी पोष्टमनचीही चांगली साथ मिळाली. त्याकाळी ग्रामीण अर्थव्यवस्था ही मनीऑर्डर वर अवलंबून असायची. शहरातील चाकरमान्यांच्या मनीऑर्डरवर ग्रामीण कुटुंबीयांचा मोठा आधार असायचा. गावातील वृध्द आईवडील, आजी आजोबा आस्थेने मनी ऑर्डर कडे डोळे लाऊन असायचे. दूर कोसावर वाडी वस्त्यात रहाणाऱ्या या वृद्ध आजी आजोबांना मनी ऑर्डरचा निरोप देण्याचे कामही गावकर यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्या प्रमाणे आपुलकीने केले. त्यामुळे गावकर यांचा ग्रामस्थ, ग्राहकांशी आजही तेव्हढाच जिव्हाळ्याचा , प्रेमाचा संबंध आहे. नोकरी संभाळत त्यांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचे मोठे कार्य करत समाजापुढे एक चांगला आदर्श निर्माण केला. त्यांच्या या आदर्शाचा वारसा त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र डॉ. योगेश गावकर यांनी कृषी क्षेत्रात पी.एच.डी. प्राप्त केली. दुसरा मुलगा अभिषेक याने हॉटेल मॅनेजमेंट मध्ये यश मिळविले आहे.

आपल्या सत्काराला उत्तर देताना अनिल गावकर यांनी भाऊक होऊन सांगितले की ग्रामस्थ, ग्राहकांच्या सहकार्यामुळे मला काम करता आले. गाववाल्यांची आपुलकी, प्रेम हेच माझ्यासाठी मोठे आशीर्वाद आहेत. मी ते कधीच विसरू शकत नाही. डॉ. योगेश गावकर यानेही अतिशय भाऊक होत आपल्या वडिलांच्या प्रेमाखातर आलेल्या सर्वांचे विशेष आभार मानत आपणही आपल्या जीवनात वडिलांचा, काकांचा आदर्श घेऊन समाजासाठी काम करत राहणार. असे सांगितले.

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक माजी सरपंच अनिल पोकळे, सूत्रसंचालन सेवानिवृत्त मुख्याध्यापक विजय गावकर यांनी तर आभार डॉ. योगेश गावकर यांनी मानले. यावेळी गावकर कुटुंबीयांनी सर्वांसाठी स्नेहभोजनचे आयोजन केले होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स