माईण येथील श्री देव माधवगिरी देवालयात उद्या २६ नोव्हेंबरला वार्षिक जत्रोत्सव..!
संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील
कणकवली तालुक्यातील माईण येथील जागृत ग्रामदैवत श्री देव माधवगिरी देवालयात २६ नोव्हेंबर रोजी वार्षिक जत्रोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.
यादिवशी सकाळी पूजा अर्चा, दुपारी १ वाजता महाप्रसाद , रात्री १० वाजता टीपर पाजळने, ११ वाजता तरंग प्रदक्षणा, रात्री १ वाजता चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ ( संचालक सुधाकर दळवी ) यांचा दशावतारी नाट्य प्रयोग होणार आहे. तरी या सुवर्ण संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान कमिटी, ग्रामस्थ यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)