ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कळसुली आरोग्य केंद्रामार्फत वाडी निहाय 'आयुष्यमान भारत कार्ड'  शिबीर व वितरण.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कळसुली आरोग्य केंद्रामार्फत वाडी निहाय 'आयुष्यमान भारत कार्ड' शिबीर व वितरण.

प्रकाशन: 18 Nov 2023 10:42 PM
वाचन संख्या 184

शनिवारी हळवल भाकरवाडी येथे संपन्न झाले शिबीर ; ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे समाधान.

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या हळवलच्या भाकरवाडी येथे कळसुली आरोग्य केंद्राच्या माध्यमातून वाडी निहाय शिबिरांचे नियोजन करुन ‘आयुष्यमान भारत’ योजनेच्या लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळवून द्यायचा प्रयत्न होत आहे. शनिवारी, १८ नोव्हेंबरला त्याचाच एक उपक्रम संपन्न झाला. सध्या देशभरात पाच लाखांपर्यंत मोफत उपचारासाठी आयुष्यमान भारत योजनेच्या कार्डचे वितरण करण्यात येत आहे. यासाठी सामान्य माणसांपर्यंत ह्या योजना पोहोचाव्या यासाठी वेगवेगळ्या यंत्रणांमार्फत ‘आयुष्यमान भारत’ योजनेच्या लाभार्थ्यांना ते कार्ड अगदी मोफत काढून दिले जात आहे. तसेच ते कार्ड आपल्या असलेल्या पत्त्यावर पोस्टाने देखील पोहोच करण्यात येणार आहे, असे असताना सध्या आरोग्य विभाग, ग्रामपंचायत, राशन वितरण दुकान यासह इतर ठिकाणी या कार्डचे लाभार्थ्यांना वितरण करण्यात येत आहे.

यावेळी आरोग्यसेवक गंगाधर पाटील, सि. एच. ओ. अश्विनी तावडे, दिप्ती मोंडकर ( परिचारका कर्मचारी ), निलेश ठाकूर ( माजी उपसरपंच ) उपस्थित होते.

यावेळी या शिबिराचा ४० लोकांनी लाभ घेतला तसेच काही नागरिकांनी यापूर्वी आरोग्य केंद्राने राबविलेल्या शिबिरांमध्ये कार्ड काढली असल्याची माहिती श्री. पाटील यांनी दिली. तर शिबिरावेळी कोणाला काही आजारपण असल्यास त्याची तपासणी देखील यावेळी करण्यात आली. त्यामुळे नागरिकांमधून देखील समाधान व्यक्त करण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स