ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
खारेपाटण हे जिल्ह्यातील महत्वाचे शहर असून त्यातील रखडलेल्या विकासकामांकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधून ती कामे पूर्णत्वाकडे नेणार : आमदार रवींद्र फाटक.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

खारेपाटण हे जिल्ह्यातील महत्वाचे शहर असून त्यातील रखडलेल्या विकासकामांकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधून ती कामे पूर्णत्वाकडे नेणार : आमदार रवींद्र फाटक.

प्रकाशन: 18 Nov 2023 10:23 PM
वाचन संख्या 139

खारेपाटण | प्रतिनिधी : आमदार रवींद्र फाटक यांनी शनिवारी खारेपाटण मधील शिंदे गटाच्या शिवसेना पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांची भेट देत त्यांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील जनतेला दिवाळीच्या दिलेल्या शुभेच्छा पक्षाच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यापर्यंत पोहचविण्या बरोबरच खारेपाटण मधील विकासकामाचे असणारे प्रमुख प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याचे प्रतिपादन आमदार रवींद्र फाटक यांनी खारेपाटण येथील शिवसेना पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना केले. यावेळी जिल्हा प्रमुख संजय आंग्रे, कणकवली, देवगड वैभववाडी विधानसभा प्रमुख संदेश पटेल, उपजिल्हा प्रमुख बापू धुरी, शिवदूत योजनेचे जिल्हा समन्वयक प्रतीक भिसे, महीला आघाडी उपजिल्हा प्रमुख सौ नंदिनी पराडकर, कणकवली उपतालुका प्रमुख मंगेश गुरव, खारेपाटण सरपंच सौ प्राची ईसवलकर, ग्रा.पं.सदस्य श्री गुरूप्रसाद शिंदे, सुधाकर ढेकणे, सौ. अस्ताली पवार, खारेपाटण गांव तंटामुक्त समिती अध्यक्ष सुहास राऊत, कार्यकर्ते श्री लियाकत काझी, शारुख काझी, बब्या खांडेकर, सचिन शिंदे आदी शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावतीने सर्व शिवसैनिक पदाधिकारी यांना दिवाळी भेट वस्तू वाटपाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण येथून करण्यात आला. यावेळी त्यांचा खारेपाटण येथील पदाधिकारी यांच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. आमदार रवींद्र फाटक यांच्या शुभहस्ते सर्व कार्यकर्त्यांना दिवाळीचा फराळ वाटप करण्यात आला. यावेळी खारेपाटण मधील विविध विकास कामाबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार रवींद्र फाटक यांनी खारेपाटण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाचे ऐतिहासिक शहर असून मा. मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास ही बाब लक्षात आणून देऊन खारेपाटण मधील रखडलेली सर्व विकासकामे कामे लवकरच पूर्णत्वाला नेण्यात येतील असे आश्वासन ग्रामस्थ व पदाधिकारी यांना दिले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स